कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; 18 पैकी 17 जागेवर दणदणीत विजय ; माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची खेळी यशस्वी…

कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; 18 पैकी 17 जागेवर दणदणीत विजय ; माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची खेळी यशस्वी…

आधुनिक केसरी न्यूज 

अशोक हाके 

कुंडलवाडी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित संगमेश्वर शेतकरी विकास पॅनल ने 18 पैकी 17 जागेवर दणदणीत विजय मिळवित भाजपा प्रणित कुंडलेश्वर शेतकरी विकास पॅनलचा दारुण पराभव करून बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला आहे..
कुंडलवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी मतदान प्रक्रिया दिनांक सात रोजी पार पडून दिनांक आठ रोजी नगरपालिका सभागृह येथे मतमोजणी पार पडली आहे. महाविकास आघाडी प्रणित संगमेश्वर शेतकरी पॅनल ने 18 पैकी 17 जागेवर विजय मिळविला आहे तर भाजपच्या कुंडलेश्वर शेतकरी विकास पॅनलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.यामधील मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : विविध सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ ऐबडवार सुनील 122 मते, कदम अशोक 107, चंदनकर संतोष 117, भाले बाबाराव 130, यरकलवाड राजेंद्र 108, लखमपुरे हनमंत 130, शिंदे आनंदराव 124, सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघ ढगे देवणबाई 124, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ मेहेत्रे कोंडीबा 127, सेवा सहकारी इतर मागास मतदारसंघ मोहमद खय्युम 116, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ नरवाडे माधव 99, शिंदे साहेबराव 99, ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या मागास मतदारसंघ साईनाथ निवळे 120, ग्रामपंचायत अनुजाती जमाती मतदार संघ पतंगे सिद्धार्थ 131, हमाल मापाडी मतदारसंघ वारेवार शंकर 81,असे उमेदवार विजयी झाले आहेत तर व्यापारी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राजेश्वर उत्तरवार,रमेश दाचावार,हे बिनविरोध निवडून आले आहेत. 18 जागेपैकी 17 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे पुन्हा एकदा कुंडलवाडी बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर जी कोरवार,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बी पी तलारवार, सचिव लक्ष्मीकांत येपुरवार,यांनी काम पाहिले आहे.मतमोजणी केंद्राबाहेर सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित कासले, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

उल्लेखनीय कामाची प्रशांसा आणि दुसऱ्याच दिवशी हवालदार सापळ्यात ;एवढ्या रुपयाची घेतली लाच... उल्लेखनीय कामाची प्रशांसा आणि दुसऱ्याच दिवशी हवालदार सापळ्यात ;एवढ्या रुपयाची घेतली लाच...
आधुनिक केसरी न्यूज  जळगाव : उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तिपत्र देत सत्कार झालेला जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार ५० हजार...
आज अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
गडचिरोली जिल्ह्यात पुरांचा पाऊस , पुरामुळे तब्बल 50 मार्ग बंद! जीवनाआवश्यक वस्तूचा तुटवडा
मानवतेचा पूजक हरपला : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते , सरचिटणीस विलास मानेकर
माणुसकीला काळीमा साईनाथ रुग्णालयात आढळले जन्मलेल मृत अर्भक, वाचून थक्क व्हाल
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचे नागरिकांना आवाहन...
तत्काळ अजित पवार पुण्याकडे रवाना