औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे
On
आधुनिक केसरी न्यूज
औरंगाबाद : विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष निवडीची बैठक आज पार पडली. या बैठकीत साम टि. व्ही.चे डॉ. माधव गुणवंतराव सावरगावे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
विभागीय संचालक (माहिती) कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली, त्यात समितीचे सदस्य चक्रधर दळवी, अनिल महाजन, डॉ. माधव सावरगावे, विनोद काकडे, अरुण सुरडकर यांनी सहभाग घेतला.
डॉ.माधव सावरगावे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. औरंगाबाद विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी काम पाहिले. यावेळी समिती सदस्यांसह माहिती अधिकारी डॉ मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे उपस्थित होते.
*****
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
11 Mar 2026 16:41:06
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : वन्यजीव आणि पर्यावरणासाठी घातक ठरण्याची शक्यता असलेला लोहाडोंगरी लोहखनिज खान प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी...

Comment List