Video : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रयान -3 या यशस्वी मोहिमेचे जल्लोषी स्वागत
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं.
चंद्रयान मोहिमेमुळे भारताच्या मानाच्या शिरपेचाध्ये तुरा रोवला गेला आहे.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये जय भवानीनगर हनुमान चौक येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी "भारत माता की जय "अशा घोषणा दिल्या आणि पेढे वाटून आनंद उत्सव सहभागी झाले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.संजय खंबायते,भाजपा सचिव श्री.अशोक दामले,श्री.मारुती आगलावे,माजी नगरसेवक श्री.महेश माळवतकर,श्री.प्रविण खैरे, श्रीमती.कांता चौधरी,श्री.दिलीप जोशी,श्री.बाबू आगळे ,श्री.धोंडीराम उचित,श्री.ज्ञानेश्वर लुटे,श्री.शहाजी बरडे,श्री.सदाशिव राजगुरू,श्री.अशोक गोरे,श्री.किशोर कानडे आदी उपस्थित होते.
Comment List