Video !! मानवाची अंतराळातील झेप !!
आधुनिक केसरी न्यूज
छ्त्रपती संभाजीनगर : मानवाची अंतराळातील झेप ही अलौकिक ठरलेली आहे. भारताचे चांद्रयान मोहीम मधिल चांद्रयान -३ हे चंद्रावर दक्षिण ध्रुवावर हे विक्रम लॅंडर यशस्वीपणे उतरले.आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दक्षिण आफ्रिकेच्या मधून सगळ्या भारतीयांचे कौतुक केले.इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञानांचे मनापासून कौतुक केले.
सुधीर कोर्टीकर हे छत्रपती संभाजी नगर मधील मोठे टपाल तिकीट व नाणेसंग्राहक आहेत.त्यांच्या टपाल तिकीटाच्या माध्यमातून त्यांनी *मानवाची अंतराळीत झेप* या माध्यमातून
जगातील असंख्य राष्ट्रांनी टपाल तिकीटांतून ज्या मोहिमा झाल्या त्यांची अगणित टपाल काढली नी साऱ्या जगाला त्याची माहिती करून दिलेली आहे....
सुधीर कोर्टीकरांनी आपल्या टपाल तिकीटाच्या माध्यमातून ही माहिती ४ लाख लोकांना आपल्या प्रदर्शनातून करुन दिली आहे.त्यासाठी सुधीर कोर्टीकरांना
एक सुवर्ण दोन रौप्य दोन कांस्यपदकांनी गौरवण्यात आलेलं आहे...
दैनिक आधुनिक केसरीच्या माध्यमातून आपल्या सर्व रसिक वाचकांना माहिती साठी पाठविलेले आहे....
Comment List