नानांची ग्वाही ! केंद्र सरकार विरोधातील संघर्षात काँग्रेस पक्ष छोटे व्यापारी व दुकानदारांसोबत

नानांची ग्वाही ! केंद्र सरकार विरोधातील संघर्षात काँग्रेस पक्ष छोटे व्यापारी व दुकानदारांसोबत

 

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीने महागाई गगनाला भिडली असताना केंद्रातील मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर ५% जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील होणार आहे. या जुलमी निर्णयाविरोधात राज्यातील व्यापारी, दुकानदार रस्त्यावर ऊतरले असून, संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षात काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत असून, ‘जीएसटी विरोधाताल व्यापारी आंदोलनास’ आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, आठ वर्षापूर्वी १०० दिवसांत महागाई कमी करू असे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या आठ वर्षाच्या कार्यकाळात महागाई कमी होण्याऐवजी बुलेट ट्रेनच्या स्पीडने वाढत आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ४५० रुपये होता तो आज १ हजार ५० रूपयांहून महाग झाला आहे. युपीए सरकारच्या काळात पेट्रोल ६५ रुपये लिटर होते ते आज ११० रुपये लिटर झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भावही दुप्पट झाले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याचे स्वप्न सुद्धा स्वप्नच राहिले. देशातील बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील ऐतिहासीक उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. १.२५ कोटी महिलांनी रोजगार गमावले तर जवळपास ४ कोटी परुषांचे रोजगारही गेले आहेत.

केंद्र सरकारने चुकीच्या, मनमानी पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी केल्यामुळे महागाई तर वाढली आहेच पण छोटे व्यापारी आणि दुकानदार उद्धवस्त झाले आहेत. देशाच्या इतिहासात कधी नव्हे ते शेतीसाठी लागेणा-या यंत्रांवर आणि खतांवर कर लावण्यात आला. आता तर रुग्णालयाच्या बेडवर ५ टक्के, हॉटेलच्या खोलीवर १२ टक्के, तर पनीर, दूध, दही, लस्सी, ताक, आटा तांदूळ, गहू, बाजरी यावरही ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. अगोदरच महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले असताना जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे गरीबांनी खायचे काय? असा प्रश्न पडला आहे. जीएसटीमुळे छोटे व्यापारी आणि दुकानदारांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. केंद्र सरकारने अन्यायी पद्धतीने लावलेला ही जीएसटी तात्काळ मागे घ्यावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच जारी पुणे ग्रामीण पोलिसांकडून स्वामी चिंचोली अत्याचार प्रकरणातील आरोपीचे स्केच जारी
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे दौंड : दि.३ पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या  कुटुंबावर स्वामी चिंचोली (ता.दौंड) गावाजवळ पहाटे च्या सुमारास...
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल - रखुमाईला मुख्यमंत्र्यांच्या निवडीनुसार महावस्त्र रवाना 
कारकीन गावात कृषी दुतांकडून कृषी दिन उत्साहात साजरा..!
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तुळाणा येथे पोहचली बस ; गावकऱ्यांनी केले बसचे स्वागत
वरोरा पंचायत समितीच्या प्रवेश दाराला नागरिकांने ठोकले कुलूप..!
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर कामगार मंत्री चंद्रपुरासाठी घेणार विशेष बैठक..!
आ.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून बल्लारपुर मतदार  संघातील पोंभुर्णा येथील १६७ कोटी रुपयांच्या पाच कामांना मंजुरी