कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये 20 ते 22 मे दरम्यान भव्य कृषी प्रदर्शन !
300 हून अधिक स्टॉल्स! 19 ते 22 मे रोजी भरणार जत्रा आंब्यांची !
आधुनिक केसरी न्यूज
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि.20 ते 22 मे 2022 दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी मोफत भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून या कृषी प्रदर्शनात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
प्रदर्शनात 300 हून अधिक स्टॉल्स
येथील कृषी प्रदर्शनात 300 हून अधिक स्टॉल्स, शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शक सेमिनार्स, प्रात्यक्षिके, स्लाईड-शोज अशा अनेक गोष्टीतून उपयुक्त असे हे कृषी प्रदर्शन संपन्न होत आहे. यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची खते, बियाणे, सिंचन, औजारे तसेच शेती पुरक उत्पादनांचे स्टॉल्स असणार असून शेतीविषयक संपूर्ण माहिती प्रात्यक्षिक व मॉडेलच्या माध्यमातून एकाच ठिकाणी मिळण्याची सुवर्णसंधी येथे लाभत आहे.महिला बचतगटांना प्रोत्साहन- प्रदर्शनात महिला बचत गटांसाठीही स्टॉल्स उपलब्ध असून त्याव्दारे महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. तसेच त्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळेच या प्रदर्शनात आपण सहभागी होऊन आपल्या उत्पादनाला हजारो शेतकरी बांधवांपर्यंत पोहचण्याच्या संधीचे सोने करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी निमित्ताने केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कृषी धोरण-
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व अंतर्गत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शेतकर्यांसाठी केलेल्या अजोड कार्यास अभिवादन करण्यासाठी शाहू मिल परिसरामध्ये हे कृषी प्रदर्शन आकाराला येत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ साली करवीर इलाक्यात दुष्काळाचा प्रतिबंध करण्यासाठी जलसिंचन धोरण जाहीर करून इरिगेशन विभाग सुरू केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यातच शेती व शेतकर्यांचे हित आणि फायदा आहे, हे जाणून संस्थांनातील यात्रा व महोत्सवा प्रसंगी विशेषत: महालक्ष्मी व जोतिबा यात्रेवेळी आधुनिक तंत्रज्ञानाचे शेती प्रदर्शन भरविण्यासाठी ०६ सप्टेंबर १९१३ रोजी शाहू महाराजांनी जाहीरनामा काढला. राजर्षि शाहू महाराजांनी दूरदृष्टीने शेतकर्यांच्या दुष्काळ, बलुतेदारी, जमीन महसूल, कर्ज पुरवठा, सावकारी, जनावरे पैदास इ. बाबत निर्णय घेवून कार्य केले.
प्रदर्शनाचा उद्देश-
राजर्षि शाहू महाराजांच्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजवणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तसेच विषमुक्त शेती, शेतमालावर कमीतकमी किटकनाशकांचा वापर व सेंद्रीय शेतीस चालना देणे हाही एक प्रमुख उद्देश आहे.
अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती-
येथील शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीचा वलंब करुन जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे, यासाठी प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होऊ शकतो. कृषीक्षेत्रामध्ये विकसित झालेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या यशोगाथा, शासनाच्या विविध विभागाच्या योजना, उपक्रमांची माहिती अद्ययावत कृषि तंत्रज्ञान, नाविन्यूपर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसाय इ. बाबत मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व प्रत्यक्ष तंत्रज्ञान, आधुनिक शेती उपयोगी मशिनरी प्रत्यक्ष पाहता यावी याचे प्रात्यक्षिक पाहता यावे याकरिता कृषि प्रदर्शन, कृषि विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी व उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची थेट भेट घडावी व सामान्य शेतकऱ्यांना शंका निरसन करून घेता यावे, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.
कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना-
कृषी विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी- शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार - शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण,
समूह गट संघटीत करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे.
कृषि विषयक परिसंवाद / व्याख्याने यांचे माध्यमातून विचारांच्या देवाण-घेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे.
कृषि महोत्सवातील उपक्रम
कृषि प्रदर्शन
परिसंवाद / चर्चासत्रे
सेंद्रिय धान्य महोत्सव (उत्पादक ते ग्राहक थेट विक्री)
विक्रेता खरेदीदार संमेलन
शेतकरी व कर्मचारी सन्मान
सांस्कृतिक कार्यक्रम
सहभागी शासकीय व निमशासकीय दालने- यात २७ विविध शासकीय विभाग योजनांच्या महितीसह सहभागी होत आहेत.
1. कृषि विभाग, महाराष्ट्र शासन
2. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कृषि विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर
3. सहकार विभाग, महाराष्ट्र शासन
4. महसुल विभाग, महाराष्ट्र शासन
5. समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन
6. आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
7. मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन
8. सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र शासन
9. पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन रेशीम विकास विभाग, महाराष्ट्र शासन
10. महाऊर्जा, महाराष्ट्र शासन
11. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर
12. फलोद्यान प्रशिक्षण केंद्र, तळेगाव
13. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, पुणे
14. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे
15. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला
16. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, मुंबई
17. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे
18. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर
19. वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम
20. नाबार्ड
21. अपेडा
22. जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडीया
23. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, कोल्हापूर
24. खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ
25. कृषी उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर
26. नॅशनल सीड कॉर्पोरेशन, पुणे
27. एमआयडीसी, कोल्हापूर
प्रदर्शनातील आधुनिक तंत्रज्ञान शेती औजारे-
हरितगृह
बायोटेक्नॉलॉजी
फलोत्पादन
रेशीम विकास
मत्स्योद्योग
अॅक्वाकल्चर
दुग्धव्यवसाय व डेअरी
साठवणूक तंत्रज्ञान
प्रक्रिया व पॅकेजिंग
अपारंपरिक ऊर्जा
मार्केटींग तंत्रज्ञान
शेती व्यवसाय तंत्रज्ञान
ड्रोन तंत्रज्ञान
विविध कृषि विषयक तंत्रज्ञान प्रात्यक्षिके व मॉडेल्स
जमीन आरोग्य पत्रिका, माती व पाणी परीक्षण
भात लागवडीचा सुळकुड पॅटर्न
आदर्श गाव
पाणलोट व्यवस्थापन
मग्रा रोहयो फलबाग लागवड
नाडेप व गांडूळ यूनिट
अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका
किचन गार्डन
शेततळ्यातील मस्त्यपालन
आझोला उत्पादन
विदेशी भाजीपाला
शेतकरी अपघात विमा योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
सेंद्रिय शेती प्रमाणीकरण
टिशू कल्चर
कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी
फळप्रक्रिया
व्हर्टीकल गार्डन
विविध शेती उत्पादने महोत्सव
दिनांक १९ ते २२ मे – आंबा महोत्सव
आजरा घनसाळ, पॉलिश्ड व हातसडी तांदूळ
जांभूळ, करवंदे, फणस इ. रानमेवा
कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, सेंद्रिय नाचणी, सेंद्रिय हळद
बांबूपासून तयार केलेली उत्पादने
सेंद्रिय ताजी फळे व ताजा विषमुक्त भाजीपाला
विविध सहभागी कंपन्या-
खते – झूआरी, इफ्को, आर.सी.एफ, पुष्कर, कोरोमंडल, जीएनसी, शेतकरी सहकारी संघ,स्पीक इ.
बियाणे – निर्मल, कावेरी, सफल, इगल, अंकुर, महाबीज इ.
किटनाशक – सिंजेटा, बायर, नागर्जुन, इंडस, पारिजात इ.
ठिबक सिंचन – जैन, नेटाफीम, फिनोलेक्स इ.
यंत्रे व औजारे – व्हिएसटी, शक्तिमान, कुबोटा, महिंद्रा इ.
विशेष आकर्षण-
हेक्टरी 125 टन ऊस उत्पादन दालन ..
ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान जसे सुपर केन नर्सरी, ठिबक सिंचन, पाचट व्यवस्थापन, हुमणी नियंत्रण आणि आंतरपिके एकाच दालनात पाहण्यासाठी उपलब्ध.
फवारण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान
शासकीय फळरोपवाटीकेतील दर्जेदार विविध फळरोपे कलमे शासकीय दरात विक्रीसाठी उपलब्ध.
घोंगडी बनविणे, चप्पल बनविणे, मिठाई बनविणे, कुंभारकाम, बांबू उद्योग, बुरूड काम अशा परंपरागत उद्योगांना विशेष स्थान.
देशी बियाणे.
वैशिष्ट्यपूर्ण पिकांचे नमुने - पपईची चेरी, काळाभात, काजूगोंडे, जरबेरा, झुकीनी, काजू, सकेंश्वरी मिरची, ऊस, गुलाब इ.
चला आंब्यांच्या जत्रेत.. अस्सल हापूस आंबा मिळणार माफक दरात..!
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत श्री शाहू छत्रपती मिल, कोल्हापूर येथे दि. 19 ते 22 मे 2022 या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या आंब्यांच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.नैसर्गिकरित्या पिकवलेले अस्सल हापूस, केशर, पायरी व इतर प्रकारचे आंबे माफक दरात उपलब्ध होण्यासाठी या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे व पणन मंडळाचे उपसारव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List