संविधान वाचताना

संविधान वाचताना

संविधान वाचताना, फुलते ही छातीकाय जादू होती अशी, बाबांच्या त्या हाती !! धृ !! होवो सुखी बहुजन, हाच एक ध्यासबॅरिस्टर होण्या केला, अफाट अभ्यासदोन वेळच्या खाण्याची, होती जेथे भ्रांतसंविधानामुळे तेथे, सुखावला प्रांत जादूगार लेखणीने, जोडलेली नाती !! १ !! साधंसुधं काम नव्हे, होती दिव्यदृष्टीपंचशील, करुणेची, धम्ममय सृष्टीहळूवार सांभाळत, साऱ्यांच्या भावनादिन सोनियाचा केला, साहून यातना आनंदाने… Continue reading संविधान वाचताना


संविधान वाचताना, फुलते ही छाती
काय जादू होती अशी, बाबांच्या त्या हाती !! धृ !!

होवो सुखी बहुजन, हाच एक ध्यास
बॅरिस्टर होण्या केला, अफाट अभ्यास
दोन वेळच्या खाण्याची, होती जेथे भ्रांत
संविधानामुळे तेथे, सुखावला प्रांत

जादूगार लेखणीने, जोडलेली नाती !! १ !!

साधंसुधं काम नव्हे, होती दिव्यदृष्टी
पंचशील, करुणेची, धम्ममय सृष्टी
हळूवार सांभाळत, साऱ्यांच्या भावना
दिन सोनियाचा केला, साहून यातना

आनंदाने उजळल्या, दिस आणि राती !! २ !!

समता, बंधुता आणि, एकतेचा नारा
देत नाही संविधान, अन्यायाला थारा
लोकराज्याची आमुच्या, आहे न्यारी शान
राष्ट्रास सांधणारी ही, घटना महान

गुण्यागोविंदाने नांदो, विविधांगी जाती !! ३ !!

बंदी उठवून केली, सोय संचाराची
अभिव्यक्ती, मतदान, संधी भाषणाची
अन्न, वस्त्रासवे दिला, हक्क शिक्षणाचा
मनोभावे ठेऊ सारे, मान कायद्याचा

सुखावला बळीराजा, सुखावली माती !! ४ !!
……………….,………….

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो – ८८ ७९८९ ७७९७

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : दि.११ विधानसभेत आज अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान महसूल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील अनागोंदी...
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई
नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात 
नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 
बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक