संदेश बा भिमाचा

संदेश बा भिमाचा

वाघापरी जगावे संदेश बा भिमाचा…नाही कधी झुकावे संदेश बा भिमाचा… ज्ञानाशिवाय नाही सौंदर्य जीवनाला,आयुष्यभर शिकावे संदेश बा भिमाचा… ठेवावयास तेवत अग्नी प्रबोधनाचा,जळती मशाल व्हावे संदेश बा भिमाचा… वाटेत लाख काटे टपले जरी रुताया,ध्येयाकडे निघावे संदेश बा भिमाचा… ओठात एक त्यांच्या पोटात वेगळे रे,शत्रूस ओळखावे संदेश बा भिमाचा… आपापल्या परीने द्या योगदान नक्की,बळ चळवळीस द्यावे संदेश… Continue reading संदेश बा भिमाचा

वाघापरी जगावे संदेश बा भिमाचा…
नाही कधी झुकावे संदेश बा भिमाचा…

ज्ञानाशिवाय नाही सौंदर्य जीवनाला,
आयुष्यभर शिकावे संदेश बा भिमाचा…

ठेवावयास तेवत अग्नी प्रबोधनाचा,
जळती मशाल व्हावे संदेश बा भिमाचा…

वाटेत लाख काटे टपले जरी रुताया,
ध्येयाकडे निघावे संदेश बा भिमाचा…

ओठात एक त्यांच्या पोटात वेगळे रे,
शत्रूस ओळखावे संदेश बा भिमाचा…

आपापल्या परीने द्या योगदान नक्की,
बळ चळवळीस द्यावे संदेश बा भिमाचा…

उद्धार जीवनाचा आहे करायचा जर,
बुद्धास शरण जावे संदेश बा भिमाचा…

@संदीप वाकोडे
मुर्तिजापूर जि.अकोला
फोन नं.९५२७४४७५२९

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; या घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघड
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया :  गोंदिया जिल्ह्यातील सडक सडक अर्जुनी तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली होळी धुलीवंदनाच्या   दिवशीच दोन बालकांचा...
वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम रामटेकेचा बुडून अंत..!
आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज
शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा