शब्द काय सांगतात?भाग (१८) : आशु
आशु म्हणजे त्वरित, वेगवान, जलद. वकील किंवा मोठ्या अधिकार्यांकडे वेगाने लिहिणारे स्टेनोग्राफर असतात. ते ज्या लिपीत लिहितात ती ‘आशुलिपी’ असते. आशुलिपी म्हणजे शाॅर्टहँड. या लिपीत लिहिणार्याला आशुलिपिक म्हणतात. लवकर प्रसन्न होणार्याला ‘आशुतोष’ म्हणतात. हे भोळ्या शंकराचे एक नाव आहे. महाशिवरात्रीला रेडिओचे निवेदक शंकराचा उल्लेख ‘भगवान आशुतोष’ असा करतात.आशुग किंवा आशुगामी म्हणजे वेगाने जाणारा. हा शब्द… Continue reading शब्द काय सांगतात?भाग (१८) : आशु
आशु म्हणजे त्वरित, वेगवान, जलद. वकील किंवा मोठ्या अधिकार्यांकडे वेगाने लिहिणारे स्टेनोग्राफर असतात. ते ज्या लिपीत लिहितात ती ‘आशुलिपी’ असते. आशुलिपी म्हणजे शाॅर्टहँड. या लिपीत लिहिणार्याला आशुलिपिक म्हणतात. लवकर प्रसन्न होणार्याला ‘आशुतोष’ म्हणतात. हे भोळ्या शंकराचे एक नाव आहे. महाशिवरात्रीला रेडिओचे निवेदक शंकराचा उल्लेख ‘भगवान आशुतोष’ असा करतात.
आशुग किंवा आशुगामी म्हणजे वेगाने जाणारा. हा शब्द बाण, वारा किंवा सूर्य यांच्यासाठी वापरला जातो. गुग्गुळाच्या झाडाला आयुर्वेदात आशुपत्री असे नाव आहे. वेगाने धावतो म्हणून घोड्याला अश्व म्हणतात. अश्वावर जो स्वार होतो तो अश्विन असतो आणि घोडेस्वारी करणारी महिला असेल तर ती अश्विनी असते. कालिदासाच्या ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ नाटकात राजा दुष्यंत हरणावर बाण रोखतो तेव्हा आश्रमातला साधू त्याला आज्ञा देतो, “आशु प्रतिसंहर सायकम्।” म्हणजे पटकन बाण परत घे.
एखाद्या औषधाचा परिणाम तत्काळ होत असेल तर त्यास आशुक्रिया म्हणतात. आशु असलेले असे अनेक शब्द आपल्याला साहित्यात दिसतात. संस्कृत भाषा शिकताना शब्दांची ही रहस्ये उलगडत जातात. शब्दांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण जाणीवपूर्वक शब्द वापरू लागतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे.

About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List