बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : जिल्ह्यातील बोदलकसा जलाशयात बोट उलटल्याने दोन तरुण बुडल्याची घटना १० जून रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, इतर सात तरुण पोहून सुरक्षित बाहेर पडले. माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्या बेपत्ता तरुणांचा शोध सुरू केला. जलाशयात बुडून लापता झालेल्या तरुणांची ओळख मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे अशी पटली असून, ते दोघेही बारबसपुरा येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यात असलेले बोदलकसा जलाशय हे या भागातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. बरबसपुरा येथील सदर मित्र असलेले अक्षय बिसेन, राकेश लाडे, निखिल पटले, लकी रहांगडाले, प्रलय परधी, मनीष कोकुडे, अविनाश टेकम, मोहित रहांगडाले आणि कुणाल भोंडे हे बोडलकसा जलाशयात सहलीसाठी गेले होते. त्यानंतर ते जलाशयात बोटी बसून आनंद घेत होते. दरम्यान बोट उलटल्याने, त्यातील सर्व तरुण जलाशयात बुडू लागले परंतु सात जण पोहून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. मात्र, दोघे जण अजूनही लापता आहेत त्या तरुणांचा शोध अजूनही सुरू होता.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List