पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
बाळासाहेब भोसले
सिदखेखराजा : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी ठरली आहे. या अपघातात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबी येथील रहिवासी सौ. प्रमिला शेवराव राठोड (वय ५५ वर्षे) तसेच सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचे या दुर्घटनेत दुःखद निधन झाले. धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या या दोन्ही महिला गोदावरी नदीत बोट उलटल्याने झालेल्या अपघाताच्या बळी ठरल्या. या दुर्घटनेत इतर काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य तत्काळ राबविण्यात आले असून जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे बिबी परिसरासह संपूर्ण सिंदखेडराजा मतदारसंघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत महिलांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List