भिगवणमध्ये फायनान्स कंपनीला साडेपाच लाखांचा चुना; हफ्ते गोळा केले मात्र संस्थेत भरलेच नाहीत

६६ महिला बचत गटांची वसुली घेऊन एजंट पसार

आधुनिक केसरी न्यूज 

निलेश मोरे 

भिगवण :  परिसरातील महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करणाऱ्या भिगवण येथील एका खाजगी फायनान्स कंपनीत वसुली अधिकाऱ्यानेच (एजंट) लाखो रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात फलटण येथील एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र चंद्रकांत घोलप (रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे. याबाबत सोमनाथ बाबू भोंडवे (वय ३४, रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ६६ महिलांकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ५ लाख ६९ हजार ५०८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ भोंडवे हे भिगवण येथील 'सी कॉमर्स मार्केट सिव्हीसेसे प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी ग्रामीण भागातील गरजू महिलांना बचत गटांमार्फत व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे कर्ज १.३ टक्के व्याजाने वाटप करण्याचे काम करते. या संस्थेने कर्ज घेतलेल्या महिलांकडून साप्ताहिक अथवा मासिक हफ्त्यांची वसुली करण्यासाठी एजंट नेमले होते. १४ मे २०२५ रोजी कंपनीने सुरेंद्र घोलप (रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) याला भिगवण शाखेत वसुली अधिकारी म्हणून कामावर ठेवले होते. त्याच्यावर भिगवण, कर्जत, राशीन, करमाळा, राजेगाव, कुसेगाव आणि बारामती परिसरातील ६६ कर्जदार महिलांकडून कर्जाची मुद्दल व व्याज गोळा करून ते संस्थेच्या खात्यात जमा करण्याची मुख्य जबाबदारी होती.

सुरेंद्र घोलप याने सुरुवातीला नीट काम केले. मात्र, दि. १४ मे ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत त्याने ६६ महिलांकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ५ लाख ६९ हजार ५०८ रुपयांची वसुली केली. परंतु, ही मोठी रक्कम कंपनीच्या बँक खात्यात भरलीच नाही. आरोपी सुरेंद्र घोलप हा कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कसलाही आर्थिक हिशोब न देता अचानक कामावरून पळून गेला. कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःचा फोन कायमचा बंद करून ठेवला होता.
संशय आल्याने शाखा व्यवस्थापक सोमनाथ भोंडवे यांनी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे जुने रेकॉर्ड तपासले, तेव्हा अनेक महिलांचे हप्ते थकल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ कर्जदार महिलांशी थेट संपर्क साधला, तेव्हा सर्व महिलांनी एजंट सुरेंद्र घोलप याच्याकडे वेळेवर पैसे भरल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडे पावतीही होती. दरम्यान, कंपनीच्या वतीने शाखा व्यवस्थापक सोमनाथ भोंडवे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी सुरेंद्र चंद्रकांत घोलप (रा. फलटण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार महेश उगले पुढील तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भिगवणमध्ये फायनान्स कंपनीला साडेपाच लाखांचा चुना; हफ्ते गोळा केले मात्र संस्थेत भरलेच नाहीत भिगवणमध्ये फायनान्स कंपनीला साडेपाच लाखांचा चुना; हफ्ते गोळा केले मात्र संस्थेत भरलेच नाहीत
आधुनिक केसरी न्यूज  निलेश मोरे  भिगवण :  परिसरातील महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करणाऱ्या भिगवण येथील एका खाजगी फायनान्स कंपनीत...
लाख खरेदीसाठी गेलेल्या व्यवसायीकाचा खून ;गोरेगाव तालुक्यातील बोरगाव झुडपी-जंगल शिवारातील घटना 
विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
पिंपरी शिवारातील शेततळ्यात चौदा वर्षीय साई घुनावत मृतावस्थेत आढळला; आई-वडिलांचा घातपाताचा आरोप खुलताबाद तालुक्यात खळबळ एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने हळहळ
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन
विनानंबर रेती टिप्परची वृद्धाला जोरदार धडक; पांग्री उगले येथील ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू