मुखेड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व सेवा निवृत्त विस्तार यांच्या विरोधात; मुखेड पोलिस ठाण्यात २० हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड : सिंचन विहिरीचे देयके काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुखेड पंचायत समितीच्या एका विस्तार अधिकारी व सेवा निवृत्त विस्तार अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून त्यांच्या घरांची झडती घेण्याची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान सदरील लाच प्रकरणात प्रत्यक्षात लाच स्विकारण्यात आली नसून लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 

मुखेड पंचायत समिती अंतर्गत कुंद्राळा येथील एका नागरीकास डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेंतर्गत विशेष घटक योजनेची सिंचन विहीर मंजूर करण्यात आली होती. सदरील विहिरीचे खोदकाम पुर्ण झाल्यानंतर सिमेंटचे कडे टाकण्यासाठी दुसरा हप्ता म्हणून २ लाख ५ हजार रुपयांचे देयके मंजूर करण्याची मागणी विस्तार अधिकारी अमोल राठोड यांच्याकडे केली होती. सदर काम करण्यासाठी विस्तार अधिकारी अमोल राठोड यांनी सेवा निवृत्त विस्तार अधिकारी गणपतराव शिंदे यांच्या मार्फत २५ हजार रुपयांची मागणी केली. २६ फेब्रुवारी रोजी तक्रारदार व राठोड यांचे मोबाईलवर भेटण्यासाठी बोलणे झाले. त्यावेळी राठोड यांनी जेवढं बोलले तेवढं पैसे देण्याची मागणी केली. त्यावेळी प्रथम २० हजार अगोदर व काम झाल्यानंतर ५ हजार देण्याचे ठरले. 
तक्रारदार यांना सदर रक्कम ही लाच असल्याचे समजताच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २७ फेब्रुवारी रोजी सापळा रचला व सदर रक्कम स्वतः न घेता दुसर्याकडे देण्यास सांगितले. त्यावेळी तक्रारदार यांनी नकार दिला. ४ मार्च रोजी पुन्हा तक्रारदार यांनी पंचायत समिती मुखेड येथे सेवा निवृत्त विस्तार अधिकारी गणपतराव शिंदे यांची भेट घेऊन रक्कम देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिंदे यांनी सदर रक्कम दुकानदार यांच्याकडे देण्यास सांगितले. मात्र दुकानदार यांनी रक्कम घेण्यास नकार दिला. २० मे रोजी तक्रारदार यांनी सेवा निवृत्त विस्तार अधिकारी गणपतराव शिंदे यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांचे पोलिस निरीक्षक सुरेश बनसोडे यांनी मुखेड पोलिस ठाण्यात विस्तार अधिकारी अमोल राठोड व सेवा निवृत्त विस्तार अधिकारी गणपतराव देशमुख यांच्या विरोधात मुखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संबंधित विस्तार अधिकारी यांच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अपयश आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मुखेड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व सेवा निवृत्त विस्तार यांच्या विरोधात; मुखेड पोलिस ठाण्यात २० हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल  मुखेड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व सेवा निवृत्त विस्तार यांच्या विरोधात; मुखेड पोलिस ठाण्यात २० हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल 
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : सिंचन विहिरीचे देयके काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मुखेड पंचायत समितीच्या एका विस्तार अधिकारी...
गुंजेवाहीच्या जंगलात वाघाचा भयानक हल्ला एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू
रोटाव्हेटरवर पडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
डॉ मोटेगावकर यांच्या क्लासेससह खाजगी कोचिंग क्लासेस अघोषित बंद 
बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता
पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर फरार; सोनेसांगवी परिसरात पोलिसांची मोठी शोधमोहीम
लोहा शहरातील लॉजवर पोलिसांचा धडक छापा; अनैतिक व्यवसायाविरोधात मोठी कारवाई