बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता

आधुनिक केसरी न्यूज 

मुखेड : पोलीस प्रशासनाने एका विशिष्ट धर्माच्या राजकीय कार्यकर्त्याच्या दबावापोटी भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा कट्टर हिंदुत्ववादी रामभक्त किशोरसिंह चौहान यांचे वर दि.15 ऑक्टोबर 2016 रोजी नवरात्र उत्सव साजरे करताना दुर्गादेवी मिरवणुकीत केंद्र शासनाने बंदी घातलेल्या बनायेंगे मंदिर या गाण्यावर विशिष्ट धर्माच्या राजकीय कार्यकर्त्याच्या घरा समोर बनायेंगे मंदिर गाणे लावून सार्वजनिक नृत्य केले व शासकीय कामात अडथळा आणून एखाद्याचे मन दुखवले प्रकरणी तब्बल 13 जनावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 
याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 16 ऑक्टोबर 2016 रोजी नवरात्र महोत्सव च्या काळात अष्टभुजा दुर्गा देवी मिरवणूक करण्यात आली होती जात असताना तेलीपेठ हनुमान मंदिर चौकात देशभक्तीपर गीतावर मंडळाचे कार्यकर्ते नृत्य करत होते याच परिसरात एका विशिष्ट धर्माच्या कार्यकर्त्यांचा घर आहे विशेष म्हणजे चौक असल्यामुळे कार्यकर्ते बनायेंगे मंदिर व देशभक्ती गाणे वर ली नोंदवते करत असताना मुखेड पोलीस प्रशासनाचे कर्मचारी हस्तक्षेप करीत मिरवणूक पुढे नेण्याचा आग्रह केला पण कार्यकर्त्यांनी गाणे पूर्ण झाल्यावरच आम्ही पुढे जाऊ असे पोलीस प्रशासना सांगितले बनायेंगे मंदिर या गाण्यावर बंदी असून आपण हे गाणे वाजू शकत नाही गाणे बंद करा अन्यथा कारवाई करू असा इशारा पोलीस प्रशासन दिला यावरून कार्यकर्त्यांनी समजायचे भूमिका घेत जाणे बंद करून मिरवणूक पुढे नेली व शांततेच्या मार्गात मिळवण्याची विसर्जन झाले मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या घरी पण दुसऱ्या दिवशी कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते किशोरसिंह चौहान यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी पप्पू उर्फ माधव मुसळे, अशोक मुसळे, श्याम लालपालवाले, गणेश कदम, संजय वाघमारे, संजय पांचाळ, श्रीनिवास वाडेकर, सचिन वाडेकर, राजू कदम आदीसह 45 कार्यकर्त्यावर राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल करण्यात आले होते विशेष बाब म्हणजे या मिरवणुकीत सहभागी नसलेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव गोवण्यात आले होते. व गु. र. न. 142/2016 पोलीस ठाणे मुखेड कलम 153A कलम 186, 188, 292 भादवी प्रमाणे आणी मुंबई पोलीस कायदा कलम 36, 134 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. खोटे दाखल केल्याचे माहिती मिळताच हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन ठिय्या करताच 32 कार्यकर्त्यांचे नाव चौकशी अंती मागे घेण्यात आले. विशेष बाब म्हणजे या गुन्ह्यात मयत व्यक्तीला गोवण्यात आले होते.
तब्बल 10 वर्षानंतर साक्षी पुरावे तपासून मुखेड न्यायालयाचे कनिष्टस्तर न्यायाधीश किशोर मुंडे यांनी सर्व 12 रामभक्तांची निर्दोष मुक्तता केली आरोपी तर्फे ॲड. डी. जी. हाक्के यांनी काम पाहिले व ॲड. फारुक शेख ( एच. आर. शेख) यांनी सहकार्य केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता
आधुनिक केसरी न्यूज  मुखेड : पोलीस प्रशासनाने एका विशिष्ट धर्माच्या राजकीय कार्यकर्त्याच्या दबावापोटी भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा कट्टर...
पोलिसांवर गोळीबार करून हल्लेखोर फरार; सोनेसांगवी परिसरात पोलिसांची मोठी शोधमोहीम
लोहा शहरातील लॉजवर पोलिसांचा धडक छापा; अनैतिक व्यवसायाविरोधात मोठी कारवाई
रामाळा तलाव स्वच्छतेसाठी शिवसेनेचा मनपा आयुक्तांना 24 तासांचा अल्टिमेटम 
चाकू हल्ल्यातील आरोपी अद्याप फरार 
खरीप २०२५ पीकविमा; ₹३३६ कोटी वितरित करण्याचे आदेश आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
दोन कोटींचा खंडणीसाठी फर्निचर मॉल वर गोळीबार