हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक

हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक

आधुनिक केसरी न्यूज 
 
नांदेड : हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा येथे २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सदरील  घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच हे बळी जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी २३ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आपला रोष व्यक्त केला आहे.
 
 हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एम.एच. १२ के.एन. २५०९ क्रमांकाच्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या गंभीर अपघातात पहिल्या दुचाकीवरील  रेखाबाई भाऊराव नरवाडे (वय ४२) मुलगा यशवंत भाऊराव नरवाडे (वय २३) व नणंद अनुसया बालाजी लोणाळे (वय ४३) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 
तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, भोकर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसऱ्या जखमीला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे समजते. हडसणी फाटा हा सध्या मृत्यूचा सापळा  ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे २१ एप्रिल रोजी याच ठिकाणी दोन अपघात झाले होते. आणि दुसऱ्याच दिवशी हा भीषण थरार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी यापूर्वी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने देऊन व आंदोलने करून येथे गतिरोधक (स्पीड ब्रेकर), रेडियम इंडिकेटर्स आणि हायमास्ट लाईट बसवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. सततच्या अपघातांमुळे हडसणी गावातील नागरिक २३ एप्रिल रोजी प्रचंड आक्रमक झाले. संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जोपर्यंत या ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाही. असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. या भीषण अपघातामुळे हडसणी परिसरात शोककळा पसरली असून, नरवाडे कुटुंबावर कोसळलेल्या या आघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध
आधुनिक केसरी न्यूज    चंद्रपूर : येथे राजमाता राणी हिराई यांच्या सन्मानार्थ आयोजित ऐतिहासिक सोहळ्याला जाणीवपूर्वक गालबोट लावत निराधार आरोप काँग्रेसने...
हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक
महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे
चंद्रपूर  जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा ; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश
खासदारांचे विधान दुर्दैवी व निंदनीय : आ.करण देवतळे
पाचोरा-हडसन रस्त्यावर बिबट्याचा वावर; परिसरातील शेतकरी तसेच मजुरांनी सतर्क रहा!