सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या, आपल्या सुमधुर आवाजाने संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आशाताई म्हणजे भारतीय संगीताचा जगप्रसिद्ध आवाज होत्या. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. आशाताई यांच्या निधनाने भारतावर शोककळा पसरली आहे. विविध भाषेत गाताना मराठी भाषेची कास न सोडणाऱ्या त्या गायिका होत्या. महाराष्ट्राच्या मातीतील हिरा आपण गमावला. या लोकप्रिय गायिकेच्या जाण्याने संगीत क्षेत्राची हानी झाली. आज आपण लोकप्रिय गायिकेला गमावले मी माझ्या कुटुंब आणि पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List