राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी आमदार धोंडगे यांची शिवराज, दिलीप या पुत्रांसाठीची आजची  शेवटची धडपड

स्वार्थापोटी राष्ट्रवादी,बी आर एस,एम आर एस नंतरचा मुक्काम शिवसेना शिंदे गटात

राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी आमदार धोंडगे यांची शिवराज, दिलीप या पुत्रांसाठीची आजची  शेवटची धडपड

आधुनिक केसरी न्यूज 

लोहा : स्वतः चे राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून थोरले व कनिष्ठ दोन्ही पुत्रासाठी शेवटची धडपड होत असल्याने त्यांचे अस्तित्व टिकवून राहिलं अशी त्यांची अपेक्षा असल्यामुळे हिंदूत्व वादी पक्षाची त्यांनी कास धरली असल्याचे बोलले जात आहे. आज दि‌. (२९) मार्च रोजी शेतकरी अधिवेशनाच्या निमित्ताने लोहा येथील बाजार मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये केवळ सहा लाकडं अन् अकरा माकडंच सदरील सभेत प्रवेश करतील असेही जाणकार बोलून दाखवत आहेत.एकीकडे शेतकरी विकासाच्या गप्पा मारायच्या अन् दुसरीकडं स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा स्वार्थ साधून घ्यायचा असा त्यांचा नेहमीचाच उपक्रम पुन्हा एकदा राबवून पोळी भाजून घ्यायची.

शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने भरपूर दिले तिथे शेतकरी चळवळीत न राहता वळवळ करून राष्ट्रवादी किसान भारतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून पाऊले चालती विकासाची वाट हे ब्रिद वाक्य घेऊन आमदारकी पदरात पाडून घेतली.काळ्या आईला हिरवा शालू न पांढरा मतदार संघ भकासा कडे नेऊन ठेवला.स्वतःऔद्यौगीक विकासाच्या नावाखाली शेकडो एकर जमीन हडप केली असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे उदाहरणं भरपूर असल्याचे अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले हेच शेवटी दिसून येते म्हणावं लागेल. 
    माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांना फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील एक धाडसी नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या डोळ्यात धुळफेक करून नेमकं काय साध्य करायचे? हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. ईतर पक्षातील लोकप्रतिनिधींवर नेहमीच आरोपांचे ताशेरे ओढून स्वतः मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,भारत राष्ट्र समिती (बी आर एस), महाराष्ट्र राज्य समिती (एम आर एस), नंतर आता शंकर अण्णा धोंडगे हे शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
           माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे याना फक्त चालत्या गाडीत बसायचे आहे. राजकीय संधी साधून घ्यायची आहे म्हणून शिवसेना (शिंदे) गट हा एकमेव पर्याय समोर असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे नाव समोर करून राज्य अधिवेशन असल्याचे भासवून स्वतःची तुंबडी भरून घेणार हे अनेकजण ओळखून आहेत. मी व माझा स्वतःचा परिवार याशिवाय त्यांना जनतेचे काहीही देणेघेणे नाही.यांना हिंदूत्व, स्व.बाळासाहेब, स्व. आनंद दिघे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा नाथा भाऊ यांचे काहीही सोयरसुतक नाही. आलेला निधीवर डल्ला मारून गाड्या घोड्या बांधल्याचे भासवून सर्व हडप करायचं आहे. ना पक्ष , ना निष्ठा अशी त्यांची हकीकत वेळोवेळी प्रमाणेच याही वेळी नक्कीच दिसून येईल यात दुमत नसल्यास नवल काय? अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे. अशी प्रतिक्रिया लोहा शहरातील नगरसेवक प्रतिनिधी राजेश पाटील बोडके यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल; मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल; मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत
आधुनिक केसरी न्यूज    छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या प्रशासनाला आधुनिक बनवतांनाच प्रशासनाला गति देण्यासाठी सेवाविषयक सुधारणांचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी आमदार धोंडगे यांची शिवराज, दिलीप या पुत्रांसाठीची आजची  शेवटची धडपड
रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, खरात प्रकरण भोवलं
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल; नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सायबर तपास सुरू
पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक; तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गाणगापूर ला जाऊ म्हणून  पत्नीला बारामती हून कार मध्ये आणले आणि रस्त्यात  केला खून 
नांदेड येथील बीएड,  सीएटी केंद्रावरील गोंधळामुळे परिक्षा पुढे ढकलली