हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव

हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव

आधुनिक केसरी न्यूज 

रोहित दळवी 

वाघोली : रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोप सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. कुस्तीप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषमय वातावरणात हा समारोप सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, “लहानपणापासून मुलांमध्ये खेळाची आवड आणि संस्कार रुजावेत यासाठी विशेष क्रीडा शाळा सुरू करण्यात येणार आहेत.” त्यांनी आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या नियोजनाचे कौतुक केले

या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, शिक्षणमंत्री दादा भुसे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग, आयोजक रामकृष्ण सातव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, कुस्ती पंच प्रमुख दिनेश गुंड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या पुढाकारातून आणि भव्य नियोजनातून पार पडलेल्या या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा समारोप सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. अंतिम दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील, आमदार विजय बापू शिवतारे, आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके, खासदार अमोल कोल्हे, आमदार अमित गोरखे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार राहुलदादा कुल, शहराध्यक्ष नाना भानगिरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर रवि लांडगे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार योगेश टिळेकर, आमदार भीमराव अण्णा तापकीर, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, छत्रपती संभाजीराजे भोसले, मंत्री दादा भुसे, अभिनेते जॅकी श्रॉफ, पीसीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव
आधुनिक केसरी न्यूज  रोहित दळवी  वाघोली : रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या...
किशोर बारवकर, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू लढवय्या आणि उपनगराध्यक्ष
शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
ज्ञानोत्सवाचे भव्य आयोजन, सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन : आमदार किशोर आप्पा पाटील 
मोटारसायकलच्या संशयास्पद आगीने तर्कवितर्क; इदगाह मैदानापासून हाकेच्या अंतरावर घटना 
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
माहुर वन विभागाची तत्परता: विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान