श्रींच्या मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ; गुढीपाडवा नविन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी 

श्रींच्या मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ; गुढीपाडवा नविन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी 

आधुनिक केसरी न्यूज 

दिपक सुरोसे 

शेगांव दि. १९ श्री संत नगरी शेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १३२ वा श्रीराम नवमी उत्सवाला दि. १९ मार्च गुरुवार चित्र शुद्ध १ गुढीपाडव्या पासून विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे श्रीराम नवमी उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये दररोज मंदिरामध्ये सकाळी ६ ते ६.४५ काकडा , ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० पर्यंत महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे श्रीहरी कीर्तन असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रम दि.१९ मार्च गुरुवार पासून २६ मार्च गुरुवार असे सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील.

 यामध्ये दररोज रात्री ८ ते १० हरि कीर्तन होणार आहे 
 गुरुवार दि.१९ मार्च रोजी श्रीहरी कीर्तन ह भ प श्रीराम बुवा पाटील मु उंटावर,  शुक्रवार दि.२० मार्च रोजी ह भ प लखन बुवा पाटील मु चिंचखेडा. शनिवार दि. २१ मार्च रोजी ह भ प  गजानन बुवा काळे मु जुन्नर, रविवार दि. २२ मार्च रोजी ह भ.प ज्ञानेश्वर बुवा वराडे मु शेलुद,  सोमवार दि. २३ मार्च रोजी ह भ प पांडुरंग बुवा आवारकर मु. कातळवा , मंगळवार  दि.२४ मार्च रोजी ह भ प ज्ञानेश्वर बुवा काकडे  मु. हावरगांव , बुधवार दि.२५ मार्च रोजी ह भ प भगीरथ बुवा काळे मु. सिन्नर, गुरुवार दि.२६ मार्च रोजी ह.भ.प.पडीत बुवा क्षिरसागर मु.श्री क्षैत्र आळंदी 

दि.२६ रविवार चैत्र शुद्ध ९ श्रीराम नवमीदिनी ह भ प श्री समाधान बुवा शर्मा मु. बिड यांचे सकाळी १० ते १२ यावेळेत 'श्रीराम जन्मोत्सवाचे' किर्तन होईल.

दि.२३ मार्च पासून अध्यात्म रामायण स्वाहाकारास यागास आरंभ.
श्रीराम नवमी उत्सव निमित्त अध्यात्म रामायण स्वाहाकारास यागास मिती चैत्र शु ५ सोमवार दि. २३ मार्च आरंभ होऊन चैत्र शु ९  गुरुवार दि.२६ मार्च रोजी श्रीराम नवमीदिनी सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होईल. तद्नंतर श्रींच्या मंदिर परिसरातून दुपारी श्रीराम नवमी उत्सवा निमित्त श्रींची पालखी रथ ,अश्वासह , पताकाधारी टाळकरी व वारकरी टाळ मृदुंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात पालखी परिक्रमाकरिता निघेल.

श्रीराम उत्सवाची सांगता
श्रीराम उत्सवाची सांगता दि २७ मार्च मिति चित्र शुद्ध १० शुक्रवार ला ह भ प प्रमोद बुवा राहाणे मु. पळशी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे किर्तन व नंतर दहीहंडी गोपाल काला होऊन १३२ व्या श्रीराम नवमी उत्सवाची सांगता होईल. 

 श्री संस्थान मध्ये गुढीपाडव्यानिमित्त उभारली गुडी..
  गुढीपाडव्यानिमित्त श्री संस्थान मध्ये पारंपारिक पद्धतीने विधिवत पूजन करून गुढी उभारण्यात आली. श्रींच्या मंदिरात व परिसरात आंब्याच्या पानाची तोरणे केळीचे खांब लावून सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले असून गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाचे स्वागत श्रींच्या दर्शनाने करण्याच्या इच्छेने भाविकांचा मेळा पहाटेपासूनच विदर्भाची प्रति पंढरी व महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन भक्तिमय वातावरणात मंत्र जाप करत ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः, गण गण गणात बोते, अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय करीत भाविकांनी श्रींच्या समाधीचे  दर्शन करून मराठी नूतन वर्षाचे व गुढीपाडव्याचे स्वागत केले. गुढीपाडवा व मराठी नववर्षाची सुरुवात श्रींच्या दर्शनाने भाविकांकडून करण्यात आली. 
भक्तांचे माहेर सर्व सुखाचे भंडार असलेल्या शेगावात श्रींच्या समाधी दर्शनाने मराठी नवीन वर्षाची सुरुवात श्रींच्या आशीर्वादाने केली. त्याचप्रमाणे असंख्य भाविकांनी श्री दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाच्या २१ अध्यायाचे वाचन करून पारायण केले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रींच्या मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ; गुढीपाडवा नविन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी  श्रींच्या मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ; गुढीपाडवा नविन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी 
आधुनिक केसरी न्यूज  दिपक सुरोसे  शेगांव दि. १९ श्री संत नगरी शेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १३२ वा श्रीराम नवमी उत्सवाला...
मारतळा येथे दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारुन लुटले 
“रांगांना पूर्णविराम! पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण; घरपोच सेवा व OTPमुळे काळाबाजारावर आळा”
शिळवणी येथे वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
विधानभवनात पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नांवर बैठक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश
आडगाव येथे जखमी अवस्थेत हरणास दिले जीवनदान
चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.