नांदेड-किनवट मार्गावर भीषण अपघात : कार–दुचाकी समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
डॉ. भगवान सूर्यवंशी
नांदेड : हिमायतनगर –नांदेड ते किनवट मार्गावरील पवना पाटीच्या पुढे गुरुवारी (दि. १९) दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, दुचाकी (एमएच २६ – बीएम ८८९४) व कार (एमएच २६ – सीपी ५०८०) यांच्यात पवना पाटीपासून काही अंतरावर समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी चालक गजानन लक्ष्मण पांचाळ (वय ३५) राहणार सरसम यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सहप्रवासी शंकर पंडीतराव सर्जे देशमुख राहणार सरसम हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना नांदेड येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस पाटील माधव नखाडे यांनी दिली.
अपघातग्रस्त कार तलाठी प्रकाश लक्ष्मण तोटेवाड यांची असून अपघात झाला तेव्हा ते स्वतः वाहन चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच जमादार नवाबखान पठाण व आवूलवार यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावर यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस निरीक्षक भगत यांना बोलावून पंचनामा सुरू केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List