हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद; केळीच्या बागेत मजुरांवर केला होता हल्ल्याचा प्रयत्न
आधुनिक केसरी न्यूज
जनार्दन चव्हाण
निफाड : कोठुरे (ता. निफाड) येथे केळीच्या बागेत मजुरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारी बिबट्या मादी अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याची माहिती वनरक्षक विजय दोंदे यांनी दिली. कोठुरे येथील संस्कार सुयोग गीते यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३०१/१ मधील केळीच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात आज (दि. १८ फेब्रुवारी २०२६) पहाटे अंदाजे चार ते पाच वर्ष वयाची बिबट्या मादी अडकली. काही दिवसांपासून परिसरात बिबट्याची वावर असल्याने शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनरक्षक विजय दोंदे, गोपाल राठोड, पंकज नागपुरे तसेच निफाडच्या आधुनिक पथकातील भारत माळी, सागर दुसिंग, विजय माळी, राहुल ताटे, असिफ पटेल, सुनील भुरुक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुरक्षितरीत्या बिबट्याला ताब्यात घेऊन शासकीय वाहनाद्वारे पुढील कार्यवाहीसाठी निफाड वन उद्यान येथे हलविले. दरम्यान, बिबट्या पकडल्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List