कचऱ्याने तुंबलेला नाला साफ करा, अन्यथा नगर परिषदेसमोर उपोषण..!
नागरिकांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
आधुनिक केसरी न्यूज
जळगाव जा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पंचायत समितीला लागून असलेल्या मुख्य नाल्यात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात 'हिंमत चव्हाण' यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद जळगाव जामोद यांना लेखी निवेदन देऊन तातडीने साफसफाईची मागणी केली आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या वर्षभरापासून या नाल्याची योग्य प्रकारे स्वच्छता झालेली नाही. साचलेल्या घाणीमुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पंचायत समिती परिसरातील नाल्याची तात्काळ स्वच्छता करावी.साचलेला कचरा उचलून नाल्याचा प्रवाह मोकळा करावा.भविष्यात घाण साचणार नाही याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे की, जर या नाल्याची साफसफाई तातडीने करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.या निवेदनावर हिंमत चव्हाण यांची स्वाक्षरी असून,२२ जानेवारी २०२६ रोजी हे निवेदन नगर परिषद प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List