चंद्रपुरात पाचव्यांदा होणार महिलाच महापौर  चंद्रपूर मनपा महापौर आरक्षण जाहीर ओबीसी महिला

चंद्रपुरात पाचव्यांदा होणार महिलाच महापौर  चंद्रपूर मनपा महापौर आरक्षण जाहीर ओबीसी महिला

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : निवडणूक निकालानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष ज्या महापौर  पदाच्या सोडतीकडे लागले होते ती महापौर पदाची सोडत आज अखेर मुंबईला मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर निघाली.आता महापौरपदी कोणाला बसवायचं याचं गणित सर्व राजकीय पक्षांकडून सुरू झालं आहे. चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचे आरक्षणही जाहीर झाले असून चंद्रपूरच्या महापौर पदावर ओबीसी महिला विराजमान होणार आहे. चंद्रपूर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर चंद्रपूरच्या महापौर पदावर पाचव्यांदा पुन्हा एकदा महिलाच विराजमान होणार असून काँग्रेस तर्फे सुनंदा धोबे आणि संगीता अमृतकर हे नाव सध्या चर्चेत आहेत.भाजपचा महापौर बसावयाचा झाल्यास भाजपाकडे संगीता खांडेकर आणि अँड. सरिता संदुरकर ही दोन नावे ओबीसी प्रवर्गातून समोर येत आहेत.

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा जवळपास होत असल्यामुळे काँग्रेसचा महापौर बसेल असे चित्र सध्यातरी दिसते आहे. त्यामुळे काँग्रेसचा महापौर बसावयाचा झाल्यास खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निकटवर्ती असलेल्या आणि खासदार प्रतिभा धानोरकर ज्या ओबीसी कार्ड वर राजकारण खेळतात त्या ओबीसी कार्ड मधील कुणबी जातीच्या असलेल्या सुनंदा धोबे या या महापौर पदाच्या शर्यतीत बाजी मारतील असे चित्र सध्यातरी दिसते आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर मध्ये पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार चंद्रपूर मध्ये गटनेता, महापौर पदाचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेणार,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट चंद्रपूर मध्ये पाच वर्ष काँग्रेसचा महापौर बसणार चंद्रपूर मध्ये गटनेता, महापौर पदाचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेणार,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
आधुनिक केसरी न्यूज नागपूर : दि. २२ चंद्रपूर महापालिकेमधील वादावर अखेरीस पडदा पडला असून तिथे महापौर कोण होणार याबाबतचा निर्णय...
चंद्रपुरात पाचव्यांदा होणार महिलाच महापौर  चंद्रपूर मनपा महापौर आरक्षण जाहीर ओबीसी महिला
BREAKING : महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर
विसापूरचे एसएनडीटी महाविद्यालय ठरणार नारी सक्षमीकरणाचे राष्ट्रीय मॉडेल
चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येणार, महापौर काँग्रेसचा होणार,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार