विसापूरचे एसएनडीटी महाविद्यालय ठरणार नारी सक्षमीकरणाचे राष्ट्रीय मॉडेल
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : अत्याधुनिक सैनिक शाळा, मेडिकल कॉलेज, 280 कोटींचे कॅन्सर हॉस्पिटल,शंभर बेडेड ईएसआयसी हॉस्पिटल, 15 कोटींचे स्मार्ट आयटीआय, क्रीडा स्टेडियम व बॉटनिकल गार्डन यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे हा भाग मॉडेल म्हणून विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर विसापुर (बल्लारपूर) येथील एसएनडीटी विद्यापीठ हे नारी सक्षमीकरण, नवोपक्रम आणि स्वावलंबनाचे राष्ट्रीय मॉडेल केंद्र बनेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
विसापुर (बल्लारपूर) येथील एसएनडीटी महाविद्यालयाच्या बांधकाम प्रगतीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू रुबी ओझा, कुलसचिव विलास नंदावडेकर, वित्त व लेखाधिकारी डाॅ. विकास देसाई, संचालक डॉ. संजय नेरकर, डॉ. प्रभाकर चव्हाण, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुनील घाडगे, उपकुलसचिव बाळू राठोड, बल्लारपूरचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, संजोग मेंढे आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, विद्यापीठाच्या कॅम्पसचे बांधकाम केवळ दर्जेदारच नव्हे तर नाविन्यपूर्ण, आधुनिक आणि ‘मॉडेल कॅम्पस’ म्हणून ओळख निर्माण करणारे असावे. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश करून शिक्षणव्यवस्था अधिक प्रभावी व विद्यार्थी-केंद्रित करावी, जेणेकरून हे इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल. विद्यापीठाचे वॉल कंपाऊंड मजबूत, सुरक्षित व आकर्षक असावे, तसेच परिसरातील अंतर्गत रस्ते उत्तम दर्जाचे असावेत. रस्त्यांवर रेडियम पट्टे लावून रात्रीच्या वेळी वाहतूक सुरक्षितता वाढवावी आणि दोन्ही बाजूंना गुलमोहर व विविध फुलझाडांची लागवड करून परिसर हरित, सुंदर व पर्यावरणपूरक बनवावा. यासोबतच, पुढील पाच वर्षांत 5 हजार विद्यार्थिनींपर्यंत पोहोचण्याचा रोडमॅप विद्यापीठाने तयार करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थिनींसाठी सुमारे 300 क्षमतेचे अत्याधुनिक वसतिगृह इमारत उभे राहत असून, समाजकल्याण विभागाकडून वसतिगृहासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन मोठ्या क्षमतेचे, सुविधायुक्त होस्टेल उभारावे.
शिक्षण प्रक्रियेत गुणवत्ता वाढवण्यासाठी टिचिंग रूममध्ये डिजिटल स्क्रीन, स्मार्ट व व्हर्च्युअल क्लासरूम तसेच ई-लर्निंग सुविधा विकसित कराव्यात. संपूर्ण कॅम्पस मॉडेल कॅम्पस म्हणून उभारून आधुनिक देशी-आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. डिजिटल माध्यमांतून विद्यापीठाच्या सुविधा व उपक्रमांची सविस्तर माहिती उपलब्ध करून प्रत्येक विभाग अधिक पारदर्शक व विद्यार्थी-केंद्रित बनवावा. विद्यार्थिनींच्या पालकांसाठी गेस्ट हाऊस उभारणे, मुलींसाठी सुसज्ज क्रीडा मैदान विकसित करणे, त्यासाठी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे निधी प्रस्ताव सादर करणे तसेच क्रिकेट प्रशिक्षणासाठी बॉल थ्रोइंग मशीनसाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडे प्रस्ताव पाठवावा.
पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आत्मनिर्भर भारत, नारी से नारायणी आणि लखपती दीदी या प्रेरणादायी संकल्पना एस.एन.डी.टी. विद्यापीठातूनच अधिक प्रभावीपणे आकार घेतील, अशी दिशा ठरवून हे विद्यापीठ नारी सक्षमीकरण, नवोपक्रम आणि स्वावलंबनाचे राष्ट्रीय मॉडेल केंद्र म्हणून विकसित व्हावे, असा दृढ विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरणाच्या बळावर एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाला राष्ट्रीय व जागतिक स्तरावर अग्रगण्य संस्थेच्या पंक्तीत नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
येणाऱ्या कालावधीत अकॅडमिक बिल्डिंग, लायब्ररी, कॅफेटरिया बिल्डिंग, व्हीआयपी गेस्ट हाऊस, हॉस्टेल बिल्डिंग, ऑडिटोरियम बिल्डिंग, इनडोअर स्पोर्ट्स बिल्डिंग, एलिवेटेड वॉटर टॅंक बिल्डिंग, मेस बिल्डिंग, मेन एंट्रन्स गेट बिल्डिंग, सेंट्रल एक्झिबिशन हॉल, आकर्षक लँडस्केपिंग तसेच निवासी क्वार्टर्स, मुलींसाठी पारंपारिक खेळाचे मैदान यांचे बांधकाम प्रगतीपथावर असून, सर्व सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करून नियोजित कालावधीत पूर्णत्वास येत आहेत. यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सुरू असलेल्या बांधकामांचा दर्जा, वेळापत्रक आणि सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आरोग्य-शिक्षण-पर्यटन प्रकल्पांमुळे परिसर होणार मॉडेल झोन
या परिसरात सैनिक शाळा, बॉटनिकल गार्डन, तालुका क्रीडा स्टेडियम तसेच ईएसआयसीचे 100 बेडेड अत्याधुनिक हॉस्पिटल उभे राहत आहे. याच परिसरात 280 कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या 140 बेडेड कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. विशेष म्हणजे या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशातील पहिली हेलियम गॅसविरहित अत्याधुनिक मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संपूर्ण महाराष्ट्रातील हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स सेवेसाठी स्वतंत्र हेलिपॅड सुविधा असलेले हे एकमेव मेडिकल कॉलेज ठरणार आहे. तसेच ताडोबा पर्यटन विकासासाठी 3 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे सादर करण्यात आला असून, देशातील 50 प्रमुख पर्यटन केंद्रांमध्ये ताडोबाचा समावेश करण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List