हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : दि.११ धनुष्यबाण हा हिंदुत्वाचा धनुष्यबाण असून महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. तुम्ही धनुष्यबाणाला मतदान केल्यास तो आशीर्वाद लाडक्या भावाला पोहचणार आहे. छत्रपती संभाजीनगरात हिंदुत्वाचे मारेकरी हातपाय पसरत आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या आणि या महापालिकेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. ११) टीव्ही सेंटर मैदानावरील जाहीर विराट सभेत केले. महानगर पालिका निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या ९७ अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विराट जाहीर महासभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रा. रमेश बोरनारे, आमदार विलास भुमरे, आमदार संजना जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने, किशनचंद तनवानी, कैलास पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि उमेदवार राजेंद्र जंजाळ, अभिनेते प्रसाद ओक, दिग्दर्शक मंगेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेवर जिवापाड प्रेम करणारी ही छत्रपती संभाजीनगर ची ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती संभाजीनगर च्या नामांतराला विरोध करणारे रशीद मामू सारखे विरोधकांनी उमेदवार दिले. त्यांना कोणी दुसरे उमेदवार भेटले नाही आणि इथेही उबाठा मध्ये आता कोणी उरले नाही असा टोला विरोधकांना देत पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचणाऱ्याना तुम्ही मतदान करणार का ? असा प्रश्न यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपास्थित केला. आधी आपण औरंगाबाद चे महापौर म्हणायचो मात्र आता छत्रपती संभाजीनगरचा महापौर निवडून आणणार आहोत. आणि छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत पाणी प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पाण्याचे कुठपर्यंत आहे ? येत्या दोन महिन्यात शहराला योजनेचे पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला लवकर पाणी मिळायला हवे.
आपण मोकाट बाहेर फिरतो आणि पाण्याची चिंता महिलाना असते. त्यामुळे मी पाणी देणार, मी दिलेला शब्द पूर्ण करतो.मी कमिटमेंट करत नाही. मैने एकबार कमिटमेंट कर दी तो मै अपने आप की भी नही सुनता असा डायलॉग मारल्यावर उपस्थित जनसमुदायने टाळ्यांचा कडकडाट करत "खिच के ताण, धनुष्यबाण च्या घोषणा देत ही विराट सभा गाजवली. मुंबई, ठाण्यापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये यंदा भगवा फडकलाच पाहिजे असा निर्धार यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी विविध पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रवेश करत त्यांचे स्वागत केले. व्यासपीठावर शिवसेनेचे ९७ अधिकृत उमेदवार उपस्थित होते.
औरंगग्याला गाडला आता ओवेसी ची इच्छा पूर्ण करा
शहरात झालेल्या एका सभेत एमआयएम पक्षाचे असुदोद्दीन ओवेसी यांनी मी मेल्यावर मला याच ऐतिहासिक भूमीत दफन करा अशी इच्छा व्यक्त केली होती. हा धागा पकडत एकनाथ शिंदे म्हणाले की, औरंगजेबाची कबर याच भूमीत खोदली गेली, आणि त्याला इथेच गाडले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकरांनी आता त्या ओवेसीची इच्छा पूर्ण करावी. औरंगजेबला हिरो मानणाऱ्या पार्टी आणि ओवेसी ला गाडण्याची वेळ आली आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
अगोदरच "जलील" असलेल्यांचा आता "पतंग" कटणार..!
टीव्ही सेंटर येथील जाहीर सभेत बोलतांना अचानक दोन ते तीन पतंग कटून हवेत भरकटत होते. ते पाहुन सभेला आलेल्यानी एकच जल्लोष केला. यावर पतंग कोणाची निशाणी आहे का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित करून अगोदरच "जलील" असलेल्यांचा आता "पतंग" कटणार असा जोरदार टोला माजी खासदर इम्तियाज जलील यांचे नाव न घेता लागवला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List