भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत वडेट्टीवार यांचा प्रचाराचा धडाका!
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि.९ कोट्यावधींचा विकास निधी आणला असा खोटा प्रचार करून भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. तर चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कमिशन खोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत या कमिशनखोरांना सत्तेतून बेदखल करा अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
चंद्रपूर येथील प्रभाग ७ जटपुरा येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेत बोलताना विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे वाद, जातीयवाद आणि राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला सर्वस्वी जबाबदार असलेल्या भाजपची पोलखोल केली. आज संपूर्ण देशात व राज्यात महागाई व बेरोजगारीमुळे जनता त्रस्त झाली असून सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाल्याचेही टीका त्यांनी यावेळी केली. तर काँग्रेस काळामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय आणि हक्क व त्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात येत होती. मात्र भाजपने अमृत नळ योजना व भूमिकत गटार योजनेतून कमिशन खोरी केल्याने आज जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी सुद्धा मिळत नाही. सोबतच शहरातले अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा व सर्वसामान्य नागरिकांचे हाल याला सर्वस्वी जबाबदार भाजप सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की ,काँग्रेस पक्षाने चंद्रपूर शहराच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसचे सर्व उमेदवार हे कटिबद्ध असतील. भाजपाच्या अपयशी धोरणांवर टीका करत त्यांनी महागाई, बेरोजगारी, नागरी मूलभूत सुविधांचा अभाव याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला.
चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे उमेदवार विजयी करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, प्रवीण पडवेकर, जुनेद खान कुणाल सहारे वैद्य तसेच जेटपुरा प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार अश्विनी खोब्रागडे ,मीनाक्षी गुजरकर, मनोज वासेकर, इंजि. रमिज शेख आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List