अभाविप चे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या भूमिपूजन संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रदेशाचे 54वें प्रदेश अधिवेशन दिनांक 09, 10 व 11 जानेवारी 2025 रोजी सुमानंद सभागृह, आरमारी रोड, गडचिरोली येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दि.07 जानेवारी 2026 रोजी गडचिरोली येथील सुमानंद सभागृह येथे भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर अधिवेशनाच्या उभारणीला विधिवत सुरवात झाली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठचे मा. प्र.कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, मानवधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.प्रणय खुने व अभाविप राष्ट्रीय मंत्री कु.पायल किनाके उपस्थित होते. सोबतच गडचिरोली नगर अध्यक्ष प्रा.सौ.सुनीता साळवे, गडचिरोली नगर मंत्री श्री संकेत म्हस्के यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडचिरोली नगर उपाध्यक्ष प्रा. अनंता गावंडे यांनी केले.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की गडचिरोली सारख्या दुर्गम भागात विदर्भ प्रांत अधिवेशनाचे आयोजन होणे ही अभिमानास्पद बाब आहे.
या अधिवेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती सामाजिक जाणीव नेतृत्वगुण आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दिशा मिळणार आहे.येत्या दोन दिवसानंतर संपूर्ण विदर्भातून गडचिरोलीत येणाऱ्या युवा तरुणाईच्या स्वागताची जोरदार तयारी गडचिरोली कार्यकर्ता करत आहे, या अधिवेशनाचे अनुषंगाने गडचिरोलीच्या विविध ठिकाणी वॉल पेंटिंग आणि पोस्टर च्या माध्यमातून सुसज्जित करण्याचे कार्य सुरू आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List