भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात; हद्द कायम प्रकरणी ३० हजारांच्या लाचेची केली मागणी

भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात; हद्द कायम प्रकरणी ३० हजारांच्या लाचेची केली मागणी

आधुनिक केसरी न्यूज

संतोष जळके

जालना : शेतजमिनीची हद्द कायम करून मोजणीची फाईल निकाली काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय, केज येथील लिपिकाला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार, दि. २९ डिसेंबर रोजी केज - बीड रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोरील चहाच्या टपरीजवळ करण्यात आली.

तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी केज येथील भूमी अभिलेख

कार्यालयात हद्द कायमसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार दि. १८ डिसेंबर रोजी मोजणी करण्यात आली. मोजणीनंतर शेतजमिनीचे क्षेत्र कमी न करता फाईल मंजूर करून देण्यासाठी लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे (वय ५०, वर्ग३) यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करताना आरोपीने यापूर्वी ५ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले असून उर्वरित २५ हजार रुपये घेण्यास संमती

दर्शविल्याचे पंचांसमक्ष निष्पन्न झाले. सापळा कारवाईदरम्यान आरोपीने उर्वरित रकमेपैकी १० हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. अंगझडतीत १० हजार रुपयांची लाच रक्कम, ५ हजार ५०० रुपये रोख, विवो मोबाईल व दोन अंगठ्या मिळून आल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या नेतृत्व- ाखाली व पोलिस उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात; हद्द कायम प्रकरणी ३० हजारांच्या लाचेची केली मागणी भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात; हद्द कायम प्रकरणी ३० हजारांच्या लाचेची केली मागणी
आधुनिक केसरी न्यूज संतोष जळके जालना : शेतजमिनीची हद्द कायम करून मोजणीची फाईल निकाली काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्या...
चंद्रपूर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार यांची पदावरून हकालपट्टी
चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून भाजपामध्ये घमासान तर काँग्रेसमध्ये शीतयुद्धाचे पडसाद,निष्ठावंतांना डावलले,  आयारामांचे  स्वागत
शासकीय कृषी तंत्र विद्यालय जळगाव जिल्हा क्रीडा निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न
वारांच्या वार प्रतिवारामध्ये वारांचा वारांनाच आशीर्वाद
लोह्यातील तीन दुकानास लागली आग; आगीत लाखोचे नुकसान
राष्ट्रीय महामार्गावर ६६ लाख ९८ हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन केले जप्त; यवतमाळ एलसीबीची धडक कारवाई.!