रिसोड नगर परिषदेवर अनंतराव देशमुख यांचे “वर्चेस्व” कायम
अतीतटीच्या लढतीमध्ये भगवान दादा क्षीरसागर यांचा विजय
रिसोड: तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आहे. अतिशय चुरशी समजली जाणारी निवडणुक रिसोड नगर परिषदेवर भाजपचे भगवान दादा क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीचे बाळासाहेब देशमुख यांच्या पराभव करत विजय मिळवला आहे.
रिसोड नगर परिषद ही अतिशय चुरशीची निवडणुक सुरुवाती पासून समजली जात होती. यामध्ये महाविकास आघाडीकडून बाळासाहेब देशमुख आणि महायुतीकडून भगवान दादा क्षीरसागर हे परस्पर विरोधी नगरध्यक्ष पदासाठी निवडणुक लढवत होते. यामध्ये भगवान दादा क्षीरसागर यांनी 9881 मत घेत महाविकास आघाडाचे उमेदवार बाळासाहेब देशमुख यांच्या 903 मंतानी पराभव केला आहे.
रिसोड नगरपरिषदेवर मागील कित्येक वर्षापासून माजी मंत्री अंनतराव देशमुख यांचे वर्चेव आहे. मात्र यावेळ बाळासाहेब देशमुख यांच्या सारखा बलाढ्य उमेदावर असल्याने सत्ता बदल होणार असल्याचे बोले जात होते. मात्र ऐनवेळवर क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेश करुन त्यांना उमेदवारी जाहीर करत पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवली आहे.
क्षीरसागर यांच्या घरात तिसऱ्यांदा नगराध्यक्षपद
शहराचे संकटमोचन म्हणून नाव रूपाला आले भगवानराव शिरसागर यांच्या घरात तिसऱ्यांदा रिसोड नगराध्यक्ष आले आहे. यापूर्वी त्यांचा मुलगा आणि सून यांनी 2009 ते 2014 पर्यंत नगराध्यक्ष भूषवलेली आहे पहिल्या फेरीमध्ये भाजपचे क्षीरसागर 4 46 मतांनी आघाडीवर होते तर दुसऱ्या फेरीमध्ये ती आघाडी 528 मतांनी झाली. तिसऱ्या फेरीमध्ये ती आघाडी बाराशे सात मताची झाली चौथ्या फेरीमध्ये ती आघाडी 975 मताची झाली आणि पाचव्या फेरीमध्ये 913 मताने भाजपचे क्षीरसागर विजयी घोषित करण्यात आले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List