ही निवडणूक  वरोड्याच्या  विकासाची,लाडकी बहीण योजना बंद न करता अधिक मजबूत होणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन..!

ही निवडणूक  वरोड्याच्या  विकासाची,लाडकी बहीण योजना बंद न करता अधिक मजबूत होणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन..!

आधुनिक केसरी न्यूज

वरोडा : नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत भाजपाच्या विजयाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 55 योजना,राज्य शासनाच्या 48 योजना व जिल्हा नियोजन मंडळाच्या 124 योजना या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे सोपे होणार आहे. ही निवडणूक वरोड्याच्या विकासाची निवडणूक आहे. जनसामान्याचे विकासासाठी वरोडा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन राज्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज 29 नोव्हेंबरला वरोडा येथे बोलताना केले.

येथील कर्मवीर विद्यालयाच्या मैदानावर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत या ते बोलत होते. आमदार  करण देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा  वंदना शेंडे, वरोडा विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रमेश राजूरकर, भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉक्टर सागर वझे, वेदांती देवतळे,वरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय देवतळे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा भागडे, डॉक्टर भगवान गायकवाड, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया ताई राजुरकर यांचे सह भाजपचे 26 उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वत्र होत असलेल्या निवडणुकीत सातत्याने काँग्रेस पक्ष संकुचित होत  असल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०४७ चा विकसित वरोड्याचा आराखडा तयार करून त्यासाठी लागणारा निधी राज्य शासन तुम्ही जरा कमी पडू देणार नाही.  राज्य शासन लाडकी बहीण योजना इतर राज्याप्रमाणे  भाजप सत्तेत असेपर्यंत बंद  पडू न देता अधिक मजबूत करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाच्या सर्व योजनांची विस्तृत माहिती यावेळी उपस्थित प्रेक्षकांना दिली. या सभेला मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होत्या. दहशत व गुंडागर्दीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी व वरोडा शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मायाताई राजुरकर व भाजप नगरसेवक यांना मोठ्या संख्येने निवडून द्या. शहराच्या विकासासाठी आपण निधी खेचून आणण्याचे आश्वासन यावेळी बोलताना आमदार करण देवतळे यांनी उपस्थितांना दिले. 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आगमन होताच त्यांना सुहासिनी ओवाळले व त्यांचेवर  पुष्पवृष्टी करत त्यांना सभास्थानी आणले. काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या शहर महिला अध्यक्ष दिपाली माटे यांचे मंत्री महोदयांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय भोई समाजाच्या विदर्भ अध्यक्षा अलका पाचारे, मुस्लिम समाजाचे जाकीर शेख व काँग्रेसचे माजी तालुका महासचिव मनोहर स्वामी व काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या माजी महासचिव शिरोमणी स्वामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री महोदयांनी त्यांचे स्वागत केले. गणेश नक्षीणे व सुरज धात्रक यांनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे संचलन केले.ज्योती मोहितकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका