तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?; करडा खडकी सदार येथील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट

तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?; करडा खडकी सदार येथील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट

रिसोड: वाशिम जिल्ह्यात जून पासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीपातील सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हातचे सर्व पिक गेले, त्यांमुळे आता ज्या शेतकऱ्यांकडे रब्बी साठी पाण्याची व्यवस्था आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची रब्बी पिंकावर मदार आहे. मात्र आता महावितरणच्या ठिसाळ नियोजनामुळे करडा फिडरची थ्री पेज लाईट तास भर टिकत नसल्याने शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे.

करडा, खडकी सदार, तादळवाडी या गावातील शेतकऱ्यांची पिके लाईट अभावी जमिनीmahavitanrच्या बाहेर डोके काढत नाहीत. ज्या शेतकऱ्यांने रब्बीची सुरुवातीला लवकर पेरणी केली आहे, अशा शेतकऱ्यांची पिके सध्या तरी बरी आहेत मात्र लाईट अभावी ही सर्व पिके कोमजून जात आहे. करडा फिडरवर मागील तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात लोड वाढला आहे. त्यामुळे येथील लाईट व्यवस्थीत चालत नसल्याने यांचा शेतकऱ्यांना यांच्या मोठा फटका बसत आहे. आधीच अतिवृष्टीने कबरडे मोडले आणि आता महावितणच्या ढिसाळ कारभारमुळे पुन्हा एकदा या चार ते पाच गावातील शेतकरी संकटात सापडला आहे.

 लोकप्रतिनिधी निवडणुकामध्ये मगशुल; शेतकरी मात्र वाऱ्यावर

मागील चार ते पाच वर्षापासून करड फिडर वरील गावाना हिवाळी सिजन चालू झाले की, लाईट अभावी अर्धे पिक वाळून जाते, पर्यांने उत्पनात घट होते. याकडे तालुक्यातील कुठल्याच लोकप्रतीनीधीनी लक्ष घातले नाही. अशी तक्रार आता शेतकरी वर्गाकडून करण्यात येते आहे.

सचिन सदार ( तंटामुक्ती अध्यक्ष खडकी सदार )

करडा फिडरवर मागील तीन चार वर्षापासून सिजन चालू झाल्यानंतर हा लोड वाढत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याकडे लोकप्रतिनीधी वेळीची लक्ष दिले असते तर आज शेतकऱ्यांवर ही वेळी अलीच नसती, त्यामुळे हा लोड कशा कमी करता येईल यावर महावितरण सोबत चर्चा करुन शेतकऱ्यांना या समस्येतून बाहेर काढावे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज
आधुनिक केसरी न्यूज  गडचिरोली : इस्रायल–इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून त्याचे पडसाद आता गडचिरोलीपर्यंत उमटले आहेत. पर्यटनासाठी दुबईला...
शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा
परदेशातील भारतीयांसाठी सुरक्षा इशारा मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये वाढता तणाव; भारतीय नागरिकांसाठी दूतावासांकडून सुरक्षा ॲडव्हायझरी जारी
मातागुजरीजी विसावा गार्डन येथे उपमहापौरांचे स्टिंग ऑपरेशन गार्डन रक्षक वैयक्तिक स्कॅन कोडवर घेत होता गार्डन प्रवेश शुल्कगार्डन रक्षक गणेश हनमंते यास केले सस्पेंड