बनगाव’ ग्रामपंचायतीचे विभाजन; ‘दहिगव्हाण खुर्द’ स्वतंत्र ग्रामपंचायत

बनगाव’ ग्रामपंचायतीचे विभाजन; ‘दहिगव्हाण खुर्द’ स्वतंत्र ग्रामपंचायत

आधुनिक केसरी न्यूज

अंबड : अंबड तालुक्यातील ग्राम प्रशासनात मोठा बदल घडवून आणत राज्य शासनाने ‘बनगाव’ ग्रामपंचायतीचे विभाजन करत ‘मौजे दहिगव्हाण खुर्द’ या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाने २७ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिकृत आदेश (क्रमांक – वीपीएम २०२५/प्र.क्र.९०/पंरा-४) जारी केला असून, या निर्णयामुळे स्थानिक विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वर्षानुवर्षे रेंगाळलेला प्रश्न अखेर मार्गी

बनगाव, दहिगव्हाण खुर्द आणि बेलगाव अशी तीन गावे मिळून अनेक वर्षांपासून एकत्रित ‘ग्रुप ग्रामपंचायत’ म्हणून कार्यरत होती. शासनाकडून येणारा निधी हा तिन्ही गावांसाठी असला, तरी लोकसंख्या जास्त असल्याने निधीचा सुमारे ७० टक्के भाग बनगावमध्ये खर्च होत असल्याची तक्रार दहिगव्हाण खुर्द व बेलगाव ग्रामस्थांनी अनेकदा केली होती. परिणामी या दोन्ही गावांचा विकास वर्षानुवर्षे खुंटलेला दिसून येत होता.

स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून या गावांच्या विभाजनाची मागणी होत होती. वाढती लोकसंख्या, मूलभूत सुविधांवरील ताण आणि निर्णयप्रक्रियेमध्ये येणारा विलंब पाहता ही मागणी शासनाने मान्य केली असून दहिगव्हाण खुर्द ग्रामपंचायत आता स्वतंत्रपणे कार्यरत होणार आहे.

प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
शासनाचे कक्ष अधिकारी शुभम घुगे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित आदेशानुसार जिल्हाधिकारी जालना, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, जिल्हा परिषद जालना यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दहिगव्हाण खुर्द येथे स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय स्थापन करण्याची तयारी लवकरच सुरू होणार असून आगामी काळात पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

गावकऱ्यांना होणारे मोठे फायदे
स्वतंत्र निधी उपलब्धता: १५वा वित्त आयोग, मूलभूत सुविधा आणि विविध शासकीय योजनांचा निधी आता थेट दहिगव्हाण खुर्द ग्रामपंचायतीकडे येणार. स्थानिक विकासाला गती : रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांची कामे स्वतःच्या निर्णयाने तात्काळ करता येणार. प्रशासकीय सुलभता: ग्रामसेवक, नोंददाखले आणि इतर सेवा गावातच उपलब्ध होणार. जबाबदार स्थानिक नेतृत्व: गावाचा विकास आणि निर्णयप्रक्रिया आता पूर्णपणे स्थानिकांच्या हाती. राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अंबड तालुक्यातील प्रशासनिक नकाशात एक नवी ग्रामपंचायत अस्तित्वात येत असून, दहिगव्हाण खुर्दच्या विकासाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले गेले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बनगाव’ ग्रामपंचायतीचे विभाजन; ‘दहिगव्हाण खुर्द’ स्वतंत्र ग्रामपंचायत बनगाव’ ग्रामपंचायतीचे विभाजन; ‘दहिगव्हाण खुर्द’ स्वतंत्र ग्रामपंचायत
आधुनिक केसरी न्यूज अंबड : अंबड तालुक्यातील ग्राम प्रशासनात मोठा बदल घडवून आणत राज्य शासनाने ‘बनगाव’ ग्रामपंचायतीचे विभाजन करत ‘मौजे...
तासभरही थ्री पेज लाइटच टिकेना, पिके जगवावी कशी?; करडा खडकी सदार येथील शेतकऱ्यांन समोर मोठे संकट
लोणी यात्रेवर राहणार सीसीटीव्हीची करडी नजर
20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली असा कांगावा करणारी आईच निघाली त्या बाळाची मारेकरी.... नोकरी करायची होती, मुल नको होते म्हणुन बाळाला फेकले नदीत..!
दहा फुटाच्या अजगराला सर्पमित्राने दिले जीवदान 
मौजा उदापूर, ब्रम्हपुरी येथील इथेनॉल प्लॅंट ला भीषण आग 
जेसाभाई मोटवानी आणि घनशाम मूलचंदानी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित