लोणी यात्रेवर राहणार सीसीटीव्हीची करडी नजर
प्रतिनीधी: शंकर पाटील सदार
रिसोड : वाशिम जिल्ह्यातील विदर्भ व मराठवाडा साठी प्रसिद्ध असलेले रिसोड तालुक्यातील श्री संत सखाराम महाराज लोणी यांच्या 147 व्या पुण्यतिथी निमीत्ताने यात्रोत्सव 19,20 नोव्हेबर रोजी कार्तीक वद्य अमावस्यापासुन प्रारंभ होत, असुन यात्रा उत्सव साजरा करण्यात येत आहे. नमुद यात्राउत्सव दरम्याण दि. 11 नोव्हेंबर रोजी नियोजन सभा संपन्न झाली असुन सदर नियोजन सभेमध्ये यात्राउत्सव दरम्याण कोणताही अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच यात्रेमध्ये सहभागी होणा-या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होवु नये याकरीता योग्य ती उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
श्री संत सखाराम महाराज यात्रा उत्सव दरम्याण मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात. त्याच्या सुरक्षिततेच्या दुष्ठीकोणातुन कोणताही अनुचित प्रकार ज्यामध्ये प्रामुख्याने महीलांची छेडखाणी, चोरी इत्यादी घटना घडणार नाही यादुष्ठीने संपुर्ण यात्रेत व मंदीर परीसरात ठिकठीकाणी पोलीस प्रशासन व पंचायत समीती प्रशासनाच्या माध्यमातुन CCTV कैमेरे बसविण्यात आले असुन त्यावर पोलीस प्रशासनाची करडी देखरेख आहे. तसेच येणा-या सर्व भाविकांना विशेष करुन महीलांनी आपले सोबत असलेले लहान मुलांकडे लक्ष द्यावे. तसेच महीलांनी आपल्या अंगावरील दागीने मौल्यवान वस्तु व वर्स ईत्यादी सुरक्षीत व सांभाळुन ठेवावे. काहीही अनुचित प्रकार निर्दशनास आल्यास 112 डायल वर किंवा पोलीसांना माहीती द्यावी, तसेच संस्थानने दिलेलया नियमानुसार शिस्तीचे पालन करावे.
संस्थेतर्फे सुद्धा स्वयंसेवक नेमले असुन ते सुद्धा मदतीला आहेत.श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी यात्राउत्सव सन 2025 चे संबंधाने पोलीस स्टेशन रिसोड येथील पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण प्रभारी अधिकारी यांचे नेत्रुत्वात कोणताही अनुचित प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व यात्राउत्सव आनंदाने व निर्विघ्नपणे पार पाडावा या करीता चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. भाविक तसेच नागरीकांत्या मदतीसाठी पोलीस मदत केंद्र तयार करण्यात आले आहे. सदर बंदोबस्ताकरीता 7 पोलीस अधिकारी, 43 पोलीस अमंलदार, 15 महीला पोलीस अमंलदार व RCP पथक नेमण्यात आलेले आहे. यात्राउत्सव सुरळीतपणे पार पाडवा याकरीता योग्य पोलीस बंदोबस्त नेण्यात आला असुन सदर बंदोबस्ताकरीता पोलीस प्रशासन सज्ज व सतर्क आहे. तसेच सर्व प्रशासकिय विभागाचे त्यामध्ये महसुल, पंचायत समिती, MSEB, ग्रामपंचायत अशा विभागांचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा भाविकांचे मदतीसाठी हजर राहणार आहेत. काही अप्रिय घटना घडू नये या करीता फायर ब्रिग्रेट वाहनाची सुद्धा २४ ताससाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List