शेतात राबणाऱ्या बाबासाहेब मनाळचा विहीरीत पडुन दुर्दैवी मृत्यू गंगापूर तालुक्यात शोककळा

शेतात राबणाऱ्या बाबासाहेब मनाळचा विहीरीत पडुन दुर्दैवी मृत्यू गंगापूर तालुक्यात शोककळा

आधुनिक केसरी न्यूज

गंगापूर : तालुक्यातील वाहेगाव येथे दुर्दैवी घटना घडली आहे. बाबासाहेब बंडु मनाळ (वय 36) हा आपल्या शेतातील दुपारच्या 2 च्या सुमारास गट क्रमांक 106 मध्ये विहरिच्या अवती भोवती तणनाशक औषध फवारणीचे काम करत असताना पाणी संपल्यामुळे विहीरीतून दोरीच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी गेला होता.त्या दरम्यान पाय घसरल्याने तोल जाऊन तो विहिरीत पडला पोहता येत नसल्या कारणाने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घराजवळच शेत असल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरड केली. तत्काळ गावकरी घटनास्थळी धावले. जयदीप गायकवाड, दत्तात्रय मनाळ, कल्याण मनाळ आदी तरुणांनी तत्परतेने मदत करत स्थानिक रुग्णवाहिकेने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून बाबासाहेब मनाळ यांना मृत घोषित केले.या घटनेची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. गावातील होतकरू तरुणाचा असा अचानक मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज आखाती संघर्षाची झळ गडचिरोलीपर्यंत; दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज
आधुनिक केसरी न्यूज  गडचिरोली : इस्रायल–इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून त्याचे पडसाद आता गडचिरोलीपर्यंत उमटले आहेत. पर्यटनासाठी दुबईला...
शाळा बंदीचा निर्णय लवकर मागे घ्या; शिक्षक, पालक, विविध संघटना रस्त्यावर 
जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
अनैतिक संबंध तोडल्यावर होणाऱ्या त्रासाला व जाचाला कंटाळून  बदनामीच्या भीतीने पती पत्नीने आत्महत्या करून संपविले जीवन 
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा अफूच्या शेतीवर छापा
परदेशातील भारतीयांसाठी सुरक्षा इशारा मध्यपूर्व व परिसरातील देशांमध्ये वाढता तणाव; भारतीय नागरिकांसाठी दूतावासांकडून सुरक्षा ॲडव्हायझरी जारी
मातागुजरीजी विसावा गार्डन येथे उपमहापौरांचे स्टिंग ऑपरेशन गार्डन रक्षक वैयक्तिक स्कॅन कोडवर घेत होता गार्डन प्रवेश शुल्कगार्डन रक्षक गणेश हनमंते यास केले सस्पेंड