काँग्रेसची नाळ सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांबरोबर : सतेज पाटील
गुडाळात राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ता मेळावा
आधुनिक केसरी न्यूज
कुडूत्री : काँग्रेस सामान्य माणूस आणि शेतकऱ्याबरोबर आहे.काँग्रेस पक्ष जनतेचे हित साधू शकतो. सध्याचे सरकार यांना शेतकऱ्यांची आपुलकी,प्रेम राहिली नाही. महाराष्ट्राची अवस्था बिकट आहे. ही परिस्थिती जर सावरायची असेल तर काँग्रेसला पर्याय नाही. असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी गुडाळ ता.राधानगरी येथे केले.ते राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे होते. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय पी.एन. पाटील आदि प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रम मेळाव्यास सुरवात करण्यात आली.
पाटील पुढे म्हणाले, पी.एन. पाटील यांनी काँग्रेस एकसंघ ठेवली व पक्षाला बळकटी दिली.येत्या निवडणुकी विरोधकांना चितपट केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभे राहण्यासाठी स्वतःहून इच्छुक आहेत. यामुळे काँग्रेस संपलेली नसून काँग्रेस काय आहे हे दाखवण्याच्या आता वेळ आलेली आहे. कार्यक्रमात श्रीमंत शाहू महाराज, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, आर.के मोरे, राहुल देसाई,सत्यजित जाधव, तालुकाध्यक्ष हिंदराव चौगले, सदाशिवराव चरापले, नितीन पाटील आदींनी मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमात काँग्रेस नेते व आमदार सतेज पाटील,खासदार श्रीमंत शाहू महाराज यांचा सत्कार सत्कार करण्यात आला. आला.कार्यक्रमास खासदार श्रीमंत शाहू महाराज,काँग्रेस जिल्हाध्यक्ष गटनेता विधान परिषद आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, नितीन पाटील,अभिजित तायशेटे, राहुल देसाई,पांडुरंग भांदिगरे, सदाशिवराव चरापले,ए.डी.पाटील,आर .के.मोरे,सुधाकर साळोखे,तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले,सत्यजित जाधव जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस सुप्रिया साळोखे,जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस वैभव तहसीलदार, तालुका समन्वयक सुशील पाटील, अभिजित पाटील, आदी मान्यवरांसह पक्षाचे कार्यकर्ते यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भो.सं अभिजित पाटील यांनी सूत्रसंचालन विश्वास पाटील, यांनी तर आभार सुशिल पाटील यांनी मांनले
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List