चक्रीवादळामुळे चाळीसगाव तालुक्यात केळींच्या बागांचे प्रचंड नुकसान ; शेतकरी हवालदिल 

चक्रीवादळामुळे चाळीसगाव तालुक्यात केळींच्या बागांचे प्रचंड नुकसान ; शेतकरी हवालदिल 

आधुनिक केसरी न्यूज

 छत्रपती संभाजीनगर : काल दिनांक 11 जून बुधवारी रात्री झालेल्या चक्री वादळाच्या तडाख्याने चाळीसगाव तालुक्यातील अनेक भागात पाऊस व जोरदार चक्री वादळामुळे नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे खुर्द या परिसरात ही झोड अधिक प्रमाणात जाणवली आहे. वाडे येथील शेतकरी विजय धर्मा महाजन यांचे टेकवाडे खुर्द परिसरात असलेले गट नंबर 61/1 व सौ कल्पना विजय महाजन यांचे गट ऩं 61/2 या शेतातील निसवण  झालेले दोन तीन हजार केळीचे झाडे चक्री वादळामुळे मुळासकट उन्मळून पडली असून घड काढण्यापूर्वी जमिनीवर आल्याने आठ-दहा लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात निराशा आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. विजय धर्मा महाजन व कल्पना विजय महाजन यांनी जवळपास तीन एकर क्षेत्रावर केळी लागवड केली होती. उत्पादनाची मोठी अपेक्षा होती. पण वादळाने उध्वस्त केले आहे .शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आव्हान नुकसानग्रस्त शेतकरी विजय महाजन व कल्पना महाजन यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : दि.११ विधानसभेत आज अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान महसूल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील अनागोंदी...
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा
बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई
नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात 
नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 
बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक