डॉ.खत्री महाविद्यालयात क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न

डॉ.खत्री महाविद्यालयात क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : (का.प्र.) स्थानिक डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर येथे २६ व २७ जानेवारी २०२५ या दोन दिवसाकरीता  क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. एन. एच. खत्री  सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव डॉ. एस. बी. कपूर, संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. प्रा. अनुश्री पाराशर मॅडम, सोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या महोत्सवाचं उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एन. एच. खत्री सर यांच्या शुभहस्ते झालं. उद्घाटन सोहळयाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. काकडे यांनी केले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणांत डॉ. एन. एच. खत्री सर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोणातून असे उपक्रम होणे गरजेचे आहे. या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात.उद्घाटन सोहळयाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संतोष कावरे यांनी केले तर मान्यवरांचे आभार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. आशिष चहारे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
आधुनिक केसरी न्यूज नागपूर : दि.2 चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी काँग्रेस महासचिव के.सी वेणुगोपाल...
दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील
माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन
प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती 
सिने स्टाईल मगराला पकडण्यात यश ; अपास संस्थेचे रेस्क्यू यशस्वी
सुकमा येथे चार नक्षलवाद्यांची शरणागती; दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश