बिस्किटांवर विष टाकून १० कुत्रे मारले; पहाडसिंगपुऱ्यातील घटना..!

बिस्किटांवर विष टाकून १० कुत्रे मारले; पहाडसिंगपुऱ्यातील घटना..!

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : मैदानावर विषारी बिस्किटे टाकून अज्ञाताने महिला उपनिरीक्षकाच्या पाळीव कुत्र्यासह चार मोकाट कुत्रे आणि चार पिल्ले असे १० कुत्रे ठार मारले. ही संतापजनक घटना गुरुवारी (३० जानेवारी) सकाळी पावणेसातच्या सुमारास पहाडसिंगपुरा भागात घडली.

फिर्यादी उषा राजू घाटे (५२, रा. शुभनगर, पहाडसिंगपुरा) या पोलिस कल्याण विभागात उपनिरीक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांनी सकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांचा लेब्राडॉर जातीचा पाळीव कुत्रा मैदानावर सोडला. पंधरा मिनिटाने त्याला घरात आणून सोडले. त्यानंतर उषा घाटे या पतीसह मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. साडेआठच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांचा कुत्रा उलट्या करत असल्याचे दिसले. तेव्हा शेजारच्या छगन सलामपुरे यांनी त्यांना सांगितले की, मैदानावर कुणीतरी विषारी बिस्किटे टाकली होती. ते त्याने खाल्ली असतील. त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले, मात्र तो मरण पावला. त्याच्यासोबत मोकाट चार कुत्रे आणि चार पिल्लेदेखील ती बिस्किटे खाऊन ठार झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसात अज्ञातांविरुद्ध बीएमएस ३२५ कलमानुसार गुन्हा दाखल केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात नवीन वीज जोडणीसाठी ५ हजारांची लाच; महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमन जाळ्यात
आधुनिक केसरी न्यूज  वैजापूर : नवीन वीज जोडणी देण्यासाठी शेतकऱ्याकडून ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनविरुद्ध लाचलुचपत...
कूलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मामा-भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मध्यरात्रीपासून उपचार सुरू
गोंदिया - बालाघाट मार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत 6 जणांचा जागीच मृत्यू, 7 गंभीर
कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा : न्यायमूर्ती संदीप शिंदे
पळसवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; शेळीवर हल्ला करून ठार
श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाख रुपयांची मदत