तीन हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यावर कठोर कारवाई..!

तीन हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यावर कठोर कारवाई..!

आधुनिक केसरी न्यूज 

जळगाव : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तलाठी यांनी सातबाराच्या उताऱ्यावर तक्रारदारासह आई व भावाचे नाव लावण्यासाठी पाच हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन हजार रुपयाची लाच घेताना लाच लूचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांनी अटक केली. याप्रकरणी त्यांना जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.

तालुक्यातील तक्रारदार यांनी त्यांच्या आई व भावाचे नाव 7/12 उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत तलाठी नितीन शेषराव भोई (वय 31) सजा कुसुबा जि. जळगाव ( वर्ग 3 ) यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज दि. 07 रोजी समक्ष लाप्रवि जळगाव यांना तक्रार दिली होती. या तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान यातील आलोसे यांनी 7/12 उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी प्रथम 5 हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर 4 हजार रुपये व तडजोडअंती 3 हजार रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर तलाठी नितीन शेषराव भोई यांना दि. 07 रोजी 3 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, एएसआय सुरेश पाटील ,पोना बाळू मराठे , पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बिलोलीत तहसीलवर धडक मोर्चा धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बिलोलीत तहसीलवर धडक मोर्चा
आधुनिक केसरी न्यूज   दिलीप घाटे  बिलोली : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा घटनात्मक हक्क असून, शासनाने या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी...
जय भवानी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..!
ओबीसी आंदोलकांचे उपोषण पोलिसांनी रोखले; वडीगोद्रीत तणाव
उमरी दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे-कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांचे नागरिकांना आवाहन
अधिवक्ता परिषदेतर्फे जामीन व अटकपूर्व जामिनावर अभ्यासपूर्ण व्याख्यान
चंद्रपूरच्या अधीरने देशात पटकावला पाचवा क्रमांक; श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
मनोज जरांगेंनी पाणी अन् सलाईन सोडले! आंदोलनाचा आज नववा दिवस