मोठी बातमी : साईबाबा संस्थानचा सशुल्क भोजनाचा तदर्थ समितीपुढे प्रस्ताव 

मोठी बातमी : साईबाबा संस्थानचा सशुल्क भोजनाचा तदर्थ समितीपुढे प्रस्ताव 

आधुनिक केसरी न्यूज 

शिर्डी :  साईबाबा संस्थान कडून शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्त भाविकांना  मोफत प्रसाद भोजन दिले जाते ते सशुल्क करावे व वाचलेल्या पैशाचा उपयोग  मुला मुलीच्या उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी करावा हि सुचना माजी खासदार डॉ सुजय विखे यांनी केल्यानंतर देशभर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या  त्या बाबत अधिक माहिती घेतली असता  प्रसादालयातील भोजन पुर्वी प्रमाणे सशुल्क करावे असा प्रस्ताव साईबाबा संस्थानने पुर्वी तयार केला असल्याचे समजते  यासाठी अभ्यासपुर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर समितीने निर्णय घ्यावा असे म्हटले असले तरी त्याबद्दल समितीने कुठलाही निर्णय घेतलेला नाही 
लोकसभा निवडणुका लागण्या अगोदर  तसा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी तदर्थ समितीच्या समोर ठेवलेला होता  तो समितीच्या विचाराधीन असला तरी  निर्णय मात्र झालेला नाही २०१० मधील समितीने घेतलेल्या निर्णय नुसार  मोठ्या व्यक्तीस १० रुपये  तर बालकांना ५ रुपये असे शुल्क  होते ते  ते आठ वर्षापासून बंद करत भोजन मोफत दिले जाते  वेळोवेळी यास मुदतवाढ मिळाली  चार वर्षापुर्वी परत प्रस्ताव ठेवला गेला परंतु  निर्णय झाला नाही  त्यामुळे मोफत भोजन सुरू राहीले  सन २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकी अगोदर पुन्हा प्रस्ताव तयार झाला त्यात त्यात मिळणारी देणगी  भोजन घेणारे साईभक्त भाविकांची संख्या  योजणेची  सुरुवात तर आज अखेर खर्च  त्यात येणारी  तुट   या सर्व बाबींचा अभ्यास करून मोठ्या व्यक्तीस १० तर लहान मुलांना ५ रुपये  सशुल्क भोजन असावे व गरजुना मोफत भोजन असावे हे प्रस्ताव मध्ये मांडण्यात आले होते  
     
प्रस्तावात या बाबीचा समावेश 
    १) व्हीआयपी  भोजन मोठी व्यक्ती ५० लहान बालक ३० हा जो दर आहे तोच ठेवावा 
२) साधु सन्याशी भिक्षुक अंध  वयोवृद्ध  अपंग निराधार गरिब यांना पुर्वी प्रमाणे मोफत भोजन 
३) मोठ्या व्यक्तीस १० लहान बालक ५ रुपये या पध्दतीने सशुल्क असावे त्यामुळे आर्थिक तुट भरून येईल 
४)  सशुल्क भोजन असल्यास अन्न प्रसाद वाया जाणार नाही पावित्र्य व महत्व देखील वाढेल 
५)  जवळ पास आठ वर्षात  स्थानिक लहान मोठा व्यवसाय करणारे फेरीवाले  मंजूर कामगार याची सख्या देखील वाढली आहे 

           प्रस्ताव समिती पुढे 
  आर्थिक आढावा असलेली तुट  आठ वर्षातील आकडेवारी येणारी देणगी होणारा खर्च सर्व बाबीचा प्रस्ताव मध्ये समाविष्ट आहे समिती समोर प्रस्ताव देखील ठेवला त्याबद्दल चर्चा झाली मात्र समिती कडून अद्याप निर्णय झालेला नाही 
 मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर साईबाबा संस्थान शिर्डी

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अनुदान घोटाळ्यातील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करुन फौजदारी गुन्हे दाखल करा अनुदान घोटाळ्यातील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करुन फौजदारी गुन्हे दाखल करा
आधुनिक केसरी न्यूज परतूर : जिल्ह्यात २०२२-२०२३ आणि २०२४ मध्ये अतिवृष्टी पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अनुदान घोटाळ्यासंदर्भात ७४...
खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
रागाच्या भरात  पोटात खूपसला खंजीर; पोलीसांनी केला गुन्हा दाखल
अंगणवाडी भरती प्रकरणी आ.हिकमत उढाण यांची लक्षवेधी;सीडीपीओ तात्काळ निलंबित 
IMA, महाराष्ट्र राज्य च्या10 जुलै 2025 च्या संपाबाबत तातडीचा निर्णय
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जन सुरक्षा विधेयक महत्वाचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी