सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना मसापचा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार

सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना मसापचा सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार

आधुनिक केसरी न्यूज 

पुणे : माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ दोन वर्षांपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.आवंदा या पुरस्कारासाठी *सुप्रसिद्ध ज्येष्ठ  कवयित्री पद्मरेखा धनकर (चंद्रपूर)* आणि *अभिनेत्री व नवोदित कवयित्री प्राजक्ता माळी (पुणे)* यांची निवड करण्यात आली आहे. अनुक्रमे अकरा आणि दहा हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, माजी आमदार अनंत गाडगीळ, परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार,कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत  अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी दिली.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
आधुनिक केसरी न्यूज जनार्दन चव्हाण निफाड : लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाकडून तीन लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचा...
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा काँग्रेस हायकमांडच्या बैठकीनंतर सुटेल,काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली : प्रा.पाटील
माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या पूर्णपणे निराधार, तथ्यहीन : प्रफुल पटेल
गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्टुडन्ट प्रोफाइल मधील माहिती मराठीतून आद्ययावत करण्याचे आवाहन
प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती 
सिने स्टाईल मगराला पकडण्यात यश ; अपास संस्थेचे रेस्क्यू यशस्वी