दणदणीत विजयानंतर मुंबईत पोहोचताच आमदार किशोर जोरगेवार यांचा देवेंद्र फडणवीस यांनी केला सत्कार

दणदणीत विजयानंतर मुंबईत पोहोचताच आमदार किशोर जोरगेवार यांचा देवेंद्र फडणवीस यांनी केला सत्कार

आधुनिक केसरी न्यूज 
 
चंद्रपूर : विधानसभा क्षेत्रात मोठ्या मताधिक्याने निवडून येत आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा चंद्रपूरचा गड परत मिळवून दिला आहे. आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शॉल व श्रीफळ देत आमदार किशोर जोरगेवार यांचा  सत्कार केला.
 नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा २२,००० हून अधिक मतांनी पराभव केला. आमदार जोरगेवार सलग दुसऱ्यांदा चंद्रपूर विधानसभेचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात मागील निवडणुकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भाजपा उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे चंद्रपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बळ पुन्हा वाढले आहे.

दरम्यान, आज मुंबईत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आमदार जोरगेवार यांचा शॉल श्रीफळ देत त्यांचा सत्कार केला.या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, "पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकेल, यासाठी मी प्रयत्नशील राहील. तसेच, चंद्रपूरातील विकासकामे मार्गी लावणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : शहरातील महात्मा गांधी मिशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील निवृत्त सेवकाने व्यकीत देयकापोटी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन...
घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश
लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात.... सगळे वराती बस मधील साखर झोपेत असताना झाला अपघात..!
अर्थसंकल्पातील विभागीय चर्चेच्या वेळीमहसूल, शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विविध विभागातील गैरव्यवहार आणले चव्हाट्यावर
वन्यजीव व पर्यावरणासाठी घातक ठरणारा लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्प रद्द करा : आ.किशोर जोरगेवार
इराण–इस्रायल युद्धाची झळ भिगवणच्या स्वयंपाकघराला; घरगुती गॅससाठी नागरिकांच्या पहाटेपासून रांगा