चंद्रपूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान चिमूर मध्ये कमी मतदान
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि. २१/११/२०२४ विधानसभा निवडणुकीतील चंद्रपूर जिल्ह्याची अंतिम आकडेवारी नुकतीच हाती आली असून या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 71.27% मतदान झालेले आहे. चंद्रपूर जिल्हा अंतर्गत सहा विधानसभा येत असून या सहाही विधानसभांमध्ये चंद्रपूर विधानसभेमध्ये मात्र सगळ्यात कमी मतदान झाले असून केवळ 57.98% च मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. सगळ्यात जास्त मतदान चिमूर विधानसभा मतदारसंघांमध्ये झाले असून त्या ठिकाणी 81.75 टक्के मतदान झाले आहे. ब्रह्मपुरी विधानसभेमध्ये 80.54% मतदान झालेले आहे. राजुरा विधानसभेमध्ये 72.71% मतदान झालेले आहे. बल्लारपूर विधानसभेमध्ये 69.7% तर, वरोरा विधानसभेमध्ये 69.48% मतदान झालेले आहे.
चंद्रपूर विधानसभेमध्ये सुरुवातीपासूनच मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. सकाळी सात ते नऊ या टप्प्यामध्ये चंद्रपूर विधानसभेत केवळ 4.78% मतदान झाले होते. दुपारी 11:00 वाजेपर्यंत 17.63% मतदान झाले होते. एक वाजेपर्यंत केवळ 29.3% मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. तीन वाजता हाती आलेल्या आकडेवारी मध्ये 41.44% मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. पाच वाजेपर्यंत 53.57% मतदारांनी मतदान केले होते. तर, अंतिम आकडेवारीनुसार म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत केवळ 57.98% मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलेला होता. चंद्रपूरच्या मतदारांमध्ये मतदानाबाबत असलेला निरुत्साह चे कारण मात्र कळू शकले नाही.
चिमूर विधानसभेमध्ये मात्र सकाळपासूनच मतदानाचा ओघ सातत्याने वाढत होता. सकाळी सात ते नऊ यादरम्यान चिमूर मध्ये 10.26% मतदान झाले होते. दुपारी एक वाजेपर्यंत 41.04% मतदान झाले होते. तीन वाजेपर्यंत 57.79% तर, पाच वाजेपर्यंत 60.21% मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावलेला होता आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल 81.75 टक्के मतदारांनी मतदान करत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त मतदान करण्याचा विक्रम नोंदविला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमदार कीर्ती कुमार भांगडीया यांच्या प्रचारासाठी चिमूर मध्ये आले होते. तर डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी भव्य जाहीर सभा घेतली होती. या दोन्ही सभांचा परिणाम म्हणून चिमूर मध्ये सगळ्यात जास्त मतदान झाल्याचे दिसून येत आहे. मतदारांनी दिलेला हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद नेमका कोणाच्या पारड्यात विजयाची माळ टाकेल याची बातमी 23 तारखेलाच कळणार आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List