गोंडवाना विद्यापीठाला 'फिक्की' चा नामांकित 'संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व' राष्ट्रीय पुरस्कार

गोंडवाना विद्यापीठाला 'फिक्की' चा नामांकित 'संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व' राष्ट्रीय पुरस्कार

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : 'फिक्की'या संस्थेने संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या प्रवर्गातून पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागितले होते. गोंडवाना विद्यापीठाने सुरु केलेल्या एकल ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमाचा या पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. या संस्थेने भारतातील सहा विद्यापीठांना सादरीकरण करण्यासाठी बोलाविले, त्यानंतर तीन विद्यापीठांचे नामांकन या  पुरस्काराकरिता करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठ राबवित असलेल्या 'गाव तिथे विद्यापीठ', 'सीआयआयआयटी', 'एसटीआरसी', या नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रमांचाही 'फिक्की'ने यानिमित्ताने दखल घेत गौरव केला. 
गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी पेसा कायदा, सामूहिक वन हक्क कायदा, जैव विविधता कायदा, वन व्यवस्थापन व संरक्षण, गौण वन उपजव रेकार्ड व अंकेक्षण यांचे प्रशिक्षण देऊन ग्रामसभाना आतापर्यंत 235 वन व्यवस्थापन आराखडे तयार करण्याकरिता तांत्रिक मदत केली आहे. विद्यापीठाच्या वतीने एकल ग्रामसभा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेश मडावी व डॉ. मनीष उत्तरवार संचालक, 'ननावसा' यांनी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल  शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल 
आधुनिक केसरी न्यूज कवठे येमाई : दि. ०४ शिरूर तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी ऊस तोड सुरू असून बिबट्यांचे शेतकऱ्यांसह नागरिकांना...
सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या
नागपूर निकालाच्या खंडपीठावर विजय वडेट्टीवार यांची तिखट प्रतिक्रिया..! 
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी
देवाभाऊ" साठी ठाण्यात शिवप्रतिमेचा अवमान ! काँग्रेसने पोलखोल करीत केली कडक कारवाईची मागणी
किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
मीच तुमचा लाडका भाऊ म्हणत पैठणमधे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले बहीणीला  लखपती करण्याचे अश्वासन