नवरात्रोत्सव विशेष : केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी मिना जगताप यांचा यशस्वी प्रवास..!

मिना जगताप यांची नवरात्रोत्सवाची नव्वी माळ

नवरात्रोत्सव विशेष : केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी मिना जगताप यांचा यशस्वी प्रवास..!

आधुनिक केसरी न्यूज 

लेखिका : किशोरी शंकर पाटील 

केद्रीय उत्पादन शुल्क अधिकारी श्रीमती मिना जगताप माझी वहिनी असल्या तरी जास्त आम्ही  मैत्रीणी आहोत.सतत भेटणे होत नसले तरी मैत्रीचे सूर जुळल्या मुळे आमच्या  फोनवर छान गप्पात रंगतात अशा सुस्वभावी श्रीमती मिना जगताप यांचा जन्म २० जून १९५१ एका सुखवस्तू कुटुंबात झाला. शालेय शिक्षण अंबरनाथ येथे झाले. मॅट्रीक नंतर अर्थशास्त्राच्या पदवीधर झाल्या. नोकरीसाठी स्पर्धा परिक्षा देऊन उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्या. याचाच परिपाक म्हणून केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात नोकरीत रूजू झाल्यावर स्वतःच्या हुशारीवर डिपार्टमेंटल परिक्षा उत्तीर्ण होऊन त्यांना प्रमोशन मिळाले. विक्रोळी नंतर भांडूप ते चर्चगेट असा नोकरीचा प्रवास अशी ३६ वर्ष नोकरी दोन मुलगी एक मुलगा यांचे संगोपन, शाळा, अभ्यास,शिक्षण यात ओढाताण व्हायची त्यांच्या मिस्टरांची पण खूप मदत असायची. मुलंही समजूदार त्यांनीही उच्च शिक्षण घेतले.

नोकरीमध्ये वरीष्ठ पदावर प्रशासनिक अधिकारी म्हणून  १२वर्ष काम केले.आॅफीसमध्ये वरीष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करता सर्वांना मदतच केली. आॅफीसमधील सहकाऱ्यांचे दिल्लीपर्यंत नांव झाले. एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्ती नुसार प्रामाणिकपणे निष्ठेने काम केले.या कामाची पावती म्हणून वरीष्ठ  अधिकारी यांनी सन्मानपत्र देऊन उचीत सन्मान केला. जबाबदारीचे काम स्विकारून ते तडीस नेण्याचा स्वभाव असल्याने न घाबरता कोणत्याही परिस्थितीत पुढे जायचे हा शिरस्ता होता.रिटायर होताना निरोप समारंभाच्या वेळी कमिशनर साहेबांनी त्यांच्या  झोकून देऊन निष्ठेने प्रामाणिक  काम, सहकाऱ्यांना वेळोवेळी मदत या  स्वभाव विशेषाचे भरभरून कौतुक केले. "त्यांच्या ठिकाणी त्यांच्या सारखे काम करणारी दुसरी ऑफिससर मिळणे कठिण " असे गौरवोद्गार काढले.

 नोकरीच्या काळात पती तुकाराम मुली सोनल मधुरा, मुलगा सिद्धेश यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. रिटायर झाल्यानंतर अनपेक्षितपणे हिप जाॅईन्टचे ऑपरेशन अयशस्वी झाले.पंधरा दिवसांत दुसरे ऑपरेशन करावे लागले. या परिस्थितीत न घाबरता प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ६ महिन्यात चालायला लागली. डाॅ. सुध्दा आश्चर्य चकीत झाले. ६० वर्ष दोन्ही पायावर चालले आता आधार घेऊन पुढचे आयुष्य चालायचे ही खूणगाठ मनाशी बांधली. पर्यटनाची आवड असल्याने मुलांसोबत दक्षिण भारत, राजस्थान, सिक्कीम, काश्मीर  तामिळनाडू ऑस्ट्रेलिया, बँकाॅक देश विदेशात भटकंती. दरवर्षी शेगाव आणि शिर्डी येथे आवर्जून जाते. यातूनच वेळ काढून दासबोध  परिक्षा दिली. आणि समीक्षकाचे  ६ वर्ष काम पाहिले. पतीच्या निधनानंतर मुलांच्या मुळे सावरले. भावंडाच्या मुलांच्या  प्रेमाने  जीवनाला उभारी मिळाली.आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करीत  आहे.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट मधील  वेतन गणेशोत्सवापूर्वी  मिळणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती  एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट मधील  वेतन गणेशोत्सवापूर्वी  मिळणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
आधुनिक केसरी न्यूज रत्नपाल जाधव  मुंबई : २५ ऑगस्ट  गणपती सणात अहोरात्र झटणाऱ्या  एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे...
नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू : पालकमंत्री अतुल सावे
तारळेतील दहीहंडीत गांगोमाऊली संघ विजेता तुफान गर्दीच्या साक्षीने साकारला दहीहंडी उत्सव
छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास मंजूरी
शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयाचा दिलासा निषेधाचे पत्र ही ‘बदनामी’ नव्हे !
अंजनी येथे शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली शेतकऱ्यांचा विरोध बघून मोजणी अधिकाऱ्यांचा गावातून काढता पाय..!
ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या 5 तासात उघडकीस ; सपोनि अक्षय सोनवणे आणि स्टाफची धडाकेबाज कामगिरी