जयंत पाटील यांनी सिन्नरमध्ये डागली तोफ ; अफगानिस्तान कांदा आयात प्रकरण  : शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा सरकारने आखला डाव 

आधुनिक केसरी न्यूज 

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये पोहोचली असून येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अफगानिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा आरोप त्यांनी सरकारवर केला. 

याबाबत सविस्तर बोलताना ते म्हणाले की अहमदशहा अबदाली अफगाणिस्तानहून आला आणि पानीपतची लढाई झाली. आता त्याच अफगाणिस्तानतून अमित शाह आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळत आहे. मराठी सैन्याचे पानीपत झाले तिथून शाह आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आणि मराठी शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव आखला आहे असा आरोप करत असतानाच देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळू नये अशी भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी घेतली आहे असेही ते म्हणाले. 

हे लोक म्हणतात महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा. निवडणुका जम्मू काश्मीरमध्ये, हरियाणामध्ये लागल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आढावा घेत आहेत. औरंगजेब २६ वर्षे महाराष्ट्रात राहिला पण मराठी माणसाचे राज्य त्याला मोडता आले नाही. शाहांनाही आम्ही हे मराठी राज्य मोडून देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे किनवट : तीर्थक्षेत्र उनकेश्वरकडून सकाळी किनवटकडे येणाऱ्या किनवट आगाराच्या बसगाडीची क्रं. एम. एच. ४१ -...
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले
शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी..!
शक्तीपीठ महामार्गाची सांगली जिल्ह्यात तिसंगी, विसापूर, शिरढोण येथे आज चौथ्या दिवशी मोजणी रोखली..!
म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; १८० लिटर देशी-विदेशी दारू जप्त
मुख्यमंत्र्यांनी  घेतली विश्वास मोहिते यांच्या तक्रारीची गंभीर दखल..!
धक्कादायक दौंडच्या स्वामी चिंचोली येथे पंढरपूरला निघालेल्या महिलांना लुटले अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून अत्याचार..!