त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली

त्या महिलेसाठी गडचिरोली पोलिसांनी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहोचवली

आधुनिक केसरी न्यूज 

गडचिरोली : अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल भामरागडचा संपर्क तुटलेला आहे. ८ सप्टेंबरला पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रसुती केली होती. मात्र, या मातेला रक्ताची गरज भासली. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत ११ सप्टेंबरला पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचवण्यात आली. पूरसंकटात आरोग्य विभागाची तत्परता व ‘खाकी’ वर्दीने दाखविलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

मंतोशी गजेंद्र चौधरी (२४,रा.आरेवाडा ता. भामरागड) असे महिलेचे नाव आहे. ८ सप्टेंबर रोजी तिला प्रसववेदना जाणवू लागल्या. मात्र, याचवेळी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. भामरागडचा संपर्क तुटला होता. मात्र, आरोग्य यंत्रणेने तत्परता दाखवत पुरातून वाट काढत तिला दवाखान्यात आणले. राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी यासाठी डॉक्टरांची मदत केली. 

दरम्यान, ९ रोजी मंतोशीची सुरक्षित प्रसूती झाली. दरम्यान, मंतोशीचा B-ve हा रक्तगट आहे. या रक्ताची एक पिशवी तिला चढवण्यात आली होती. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आणखी एका रक्त पिशवीची गरज होती. पुराने रक्ताची पिशवी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पोहोचविणे कठीण झाले होते. 

एकीकडे पूर व दुसरीकडे खराब हवामान यामुळे हेलिकॉप्टरने रक्तपिशवी पोहाेचविण्यास अडचण येत होती. अखेर ११ रोजी आकाश निरभ्र होताच गडचिरोलीतून एक पिशवी रक्त घेऊन आरोग्य कर्मचारी भामरागडला रवाना झाले. यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलीस दलाचे हेलिकॉप्टर विनाविलंब उपलब्ध करुन दिले. सध्या माता व बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, दक्षिण गडचिरोलीत पुरस्थिती गंभीर असून परिसरातील नदी नल्यांना पूर आल्याने अनेकजन अडकले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस विभाग तत्परतेने कार्यरत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्यांना वेळीच मदत पोहोचत आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सेनगाव पोलीसाची तत्परता अन; विषारी औषध प्राशन तरुणाचा जीव वाचला सेनगाव पोलीसाची तत्परता अन; विषारी औषध प्राशन तरुणाचा जीव वाचला
आधुनिक केसरी न्यूज गोपाल सातपुते  हिंगोली : सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच भागवत मुंडे यांनी आपण...
गरजा कमी ठेवा; स्वाभिमानाने जगा : ना.पंकजाताई मुंडे  बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा झाला सन्मान..! 
फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ
बीडच्या जनतेच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिवस-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यकृताचा भाग देऊन २२ वर्षीय करणला भावाने दिले जीवदान! यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांची मदत
मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी अथकपणे काम करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही