प्रिती संगमहून नवी ऊर्जा मिळाली : वसंत मुंडे

प्रिती संगमहून नवी ऊर्जा मिळाली : वसंत मुंडे

आधुनिक केसरी न्यूज 

कराड : शुर विरांची ऐतिहासिक भूमी असलेल्या कराड नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व भारताचे उप पंतप्रधान तथा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळास अभिवादन करून कृष्णा व कोयना नदीच्या प्रिती संगमावरून एक नवी ऊर्जा मिळाली असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेचे शुक्रवारी दुपारी कराड येथे आगमन झाले. त्यावेळी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, आरोग्य सेल चे अध्यक्ष डॉ. अमित खाडे, मा. आ. आनंदराव पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश लवटे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस भरत नाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

पत्रकार संवाद यात्रेमागील भूमिका मांडताना वसंत मुंडे म्हणाले की, कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या संकटानंतर वृत्तपत्र व्यवसायाला अहोटी लागली. वृत्तपत्रांचा खप कमी झाला. अनेक वृत्तपत्रांच्या आवृत्या बंद झाल्या. त्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. कोरोना काळात १५० पत्रकारांचा मृत्यू झाला. तर अनेकांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्या. पत्रकार सेवा निवृत्तीचा लाभ वेळेत न मिळाल्यामुळे काही पत्रकारांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा राज्यातील पत्रकार संघ पुढे आला. व पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फुटली. अनेकजण व्यक्त होऊ लागले. आणि आमचे म्हणणे काही प्रमाणात सरकार पर्यंत पोहोचले. 

 येत्या २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील हजारो पत्रकार मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप समरंभास उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी राज्य सरकार समोर आपल्या व्यथा मांडल्या जाणार आहेत. त्यासाठी पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले. यावेळी अनेक सामाजिक संघटनांनी पत्रकारांच्या या संवाद यात्रेला पाठिंबा दर्शविला.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार अल्प फरकाने काही जागा हुकल्या, पण संघर्ष सुरूच; निकालाचे चिंतन करणार” : आ. किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर  : ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकतीने, एकजुटीने आणि सकारात्मकतेने लढलो. आमच्याकडे ठोस विकासकामांचा अजेंडा होता आणि...
चंद्रपुर महानगर पालिका निवडणूक  2026 प्रभागनिहाय विजयी उमेदवार
बंगाली कॅम्पमध्ये अपक्ष उमेदवाराची गुंडगिरी; भाजप महिला कार्यकर्तीचा विनयभंग व मारहाण
भिगवण राशीन रोडवर ट्रॅक्टर-स्विफ्टचा भीषण अपघात ;एकचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर जखमी
६३ दिवसांत सहावा बिबट्या जेरबंद; देवगाव परिसर दहशतीखाली
हिंदुत्वाच्या धनुष्यबाणाला मतदान करून शिवसेनेचे धुरंधर शिलेदार निवडून द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
भाजपच्या कमिशनखोरीमुळे चंद्रपूर शहराचा विकास खुंटला काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांची टीका