दारुची नशा ठरली भावजईच्या खुनासाठी कारण ; राहता परीसरातील घटना
आधुनिक केसरी न्यूज
शिर्डी : गेली अनेक वर्षापासून भावजई सोबत एकत्रित राहणाऱ्या दिराने दारूच्या नशेत टनक वस्तूने मारहाण करून भावजईचा खून केल्याची खळबळ जनक घटना राहाता शहरात ,१५ चारी हद्दीत घडली असून यात सविता लहानु पवार वय ४० वर्ष या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राहाता पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी बबन गोविंद पवार याला पोलिसांनी जेरबंद केले आहे .
याबाबतची वृत्त असे की राहाता शहरात १५ चारी हद्दीत प्रकाश जगताप यांचे पेरूच्या शेतात आदिवासी समाजाचे हे कुटुंब बाभळीची झाडे तोडून भट्टी लावून कोळसा बनविण्याचे काम करीत होते . पाथर्डी येथील ठेकेदार नारायण सोमा राठोड याने हे कामगार पुरवठादार आहेत. दरम्यान शुक्रवार आठवडे बाजार असल्याचे कारण देत बबन पवार व इतरांनी पगाराचे पैसे घेतले होते तद नंतर शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत बबन गोविंद पवार याचे व मयत सविता लहानु पवार या दोघांमध्ये काहीतरी भांडणे झाले असावीत या भांडणामध्ये काहीतरी टनक वस्तूने डोक्यात कानशिलाजवळ मारहाण केल्याने ज्या मारहाणीत सविता हिचा मृत्यू झाला .मयत सविताच्या डोक्यावर कानशिलालगत गंभीर इजा झाल्याने तसेच छातीवर जखमा झाल्याने त्यात ती मृत पावली दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठवण्यासाठी आले असता तेथे सविता मृत असल्याचे त्यांना निदर्शनास आले. आरोपी हा तेथून फरार झालेला होता तर नंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली पोलिसांनी लागलीच चक्रे फिरवत आरोपीला काही तासाच्या अटक केली आहे. सविताचा खून नेमका कोणत्या कारणाने केला त्यामागचे इतर कारणे काय याचा उलगडा पोलीस तपासात समोर येईल शेतमालक प्रकाश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी बबन गोविंद पवार यांचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे हे करीत आहे.
Comment List