लाचखोर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली पाच हजाराची लाच...

लाचखोर प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने स्वीकारली पाच हजाराची लाच...

आधुनिक केसरी न्यूज 

धाराशिव : चोरीच्या गुन्ह्यात कडक कायदेशीर कारवाई न करता तक्रारदाराला मदत करून त्याच्याकडून बक्षीसापोटी पाच हजार रुपयांची लाच घेणार्‍या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पंचासमक्ष पाच हजारांची लाच घेताना कळंब पोलीस ठाण्यातील रामचंद्र किसन बहुरे व त्याचा साथीदार पोलीस हवालदार महादेव तात्याराव मुंढे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा गावानजीक उपळाई पाटी आहे. या ठिकाणी तक्रारदाराचे दिनेश नावाचे व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटसमोर काही दिवसांपूर्वी ३ शेळ्या व बोकड बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळून आले. शेळ्या आणि बोकड तक्रारदाराच्या ताब्यात असताना पोलिसांनी त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद न करता किरकोळ कारवाई करून त्याला दिलासा दिला. याप्रकरणात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बहुरे आणि पोलीस हवालदार मुंढे यांनी ढाबा चालकास मदत केल्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांचे बक्षीस मागितले. पंचासमक्ष पाच हजार रुपयांची लाच बक्षीस रुपाने मागून ती स्वीकारल्याबद्दल शिकाऊ पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. वरील दोघांच्या विरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार अंबाडी घाटात बस व बोलेरो च्या भीषण अपघातात एक ठार
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे किनवट : तीर्थक्षेत्र उनकेश्वरकडून सकाळी किनवटकडे येणाऱ्या किनवट आगाराच्या बसगाडीची क्रं. एम. एच. ४१ -...
नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचे बाप असू शकतात शेतकऱ्यांचे नाही: नाना पटोले
शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी..!
शक्तीपीठ महामार्गाची सांगली जिल्ह्यात तिसंगी, विसापूर, शिरढोण येथे आज चौथ्या दिवशी मोजणी रोखली..!
म्हसवड पोलिसांची मोठी कारवाई; १८० लिटर देशी-विदेशी दारू जप्त
मुख्यमंत्र्यांनी  घेतली विश्वास मोहिते यांच्या तक्रारीची गंभीर दखल..!
धक्कादायक दौंडच्या स्वामी चिंचोली येथे पंढरपूरला निघालेल्या महिलांना लुटले अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून अत्याचार..!